दिघीतील स्नेहछाया परिवारात पार पडले ‘अनोखे रक्षाबंधन

गणेश सातव, वाघोली

निसर्ग मानवी जीवनात अनेक नात्यांना आकार देत असतो.
या सर्व नात्यातं बहिण-भावाचे सुंदर नाते ईश्वराने निर्माण केले आहे.आपल्याकडे बहिण-भावाच्या या पवित्र नात्याचे स्मरण म्हणून रक्षाबंधन हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावर्षी दिघी येथील जीवन विद्या परिवर्तन ट्रस्ट संचलित स्नेहछाया परिवारात आगळेवेगळे रक्षाबंधन पार पडले.संस्थेत असणारी बरीचं मुलं एकल पालक, शालाबाह्य, निराधार,अनाथ तर काही भटक्या व वंचित समाजातील आहेतं.

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेण्यास मुलांना कुठे आपलेपणाने जाता येत नाही किंवा त्यांचाकडेही आपलं म्हणून जवळचं असं कोणी येतं नसतं.रक्षाबंधन सणा निमित्ताने मुलांनाही हुरहूर लागून राहत असते.आपल्याकडे कोणी येईल,आपल्याला राखी बांधतील,मायेचे,प्रेमाचे दोन शब्द बोलतील,आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देतील.

याचं विचार संकल्पेतून संस्थेतील मुलांचे रक्षाबंधन गोड व्हावे,त्यांच्या हि हातावर मायेचा,प्रेमाचा धागा बांधला जावा असा विचार पुढे आला.

चिंचवड येथील हँन्डीकँप सेंटर संस्थेचे संस्थापक सुनील चोरडिया व स्नेहछाया परिवाराचे संस्थापक प्रा.दत्तात्रय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथील पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते गणेश सातव,पत्रकार हर्षवर्धन पवार, फिजिओथेरपिस्ट डॉ. सोमनाथ मोरे यांनी स्नेहछायातील मुलांसाठी एक आठवणीतील अनोखे रक्षाबंधन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

या संकल्पनेनुसार हँन्डीकँप सेंटर येथील कांता,उषा,सोनू, आणि संगिता या प्रज्ञाचक्षू भगिनींनी स्नेहछाया संस्थेत येत संस्थेतील मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी भगिनींनी सर्व मुलांना टिळा लावून,औक्षण करुन राखी बांधली.हँन्डीकँप सेंटरच्या माध्यमातून भगिनींनी मुलांसाठी मिठाई आणली होती ती मुलांना वाटण्यात आली.स्नेहछाया परिवाराच्यावतीने सुध्दा या भगिनींसाठी मिठाई व हात रूमाल भेट स्वरूपात देण्यात आले.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या घटकांचा आनंद द्विगुणीत होत असतो.त्यांना मायेचा,प्रेमाचा आधार प्राप्त होतो.माणसा माणसातील सामाजिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी असे कृतीशील सामाजिक उपक्रम राबवणे हि काळाची गरज आहे असे मत हँन्डीकँप सेंटरचे संस्थापक सुनीलकाका चोरडिया यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

याप्रसंगी स्नेहछाया परीवारचे संस्थापक प्रा.दत्तात्रय इंगळे,प्रकल्प संचालिका सौ.सारिका इंगळे,सोमनाथ मोरे,गणेश सातव,राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

प्रा.दत्तात्रय इंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सारिका इंगळे यांनी आभार मानले.

Previous articleजालना – मराठा समाज हल्ला प्रकरणाचे ग्रामीण भागातही तीव्र पडसाद ; नारायणगावात उद्या राहणार सर्व व्यवहार बंद
Next articleबी.जे.एस.उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा