बी.जे.एस.उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

गणेश सातव,वाघोली

वाघोली येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरुण शिंदे उपस्थित होते.

शिंदे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे व स्वतःच्या शरीरासाठी रोज किमान एक तास सर्वांनी द्यावा जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. खेळामुळे शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहते व त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. तसेच मेजर ध्यानचंद यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खेळ व शारीरिक आरोग्य यांच्याबद्दल मार्गदर्शन करत असताना त्यांनी छोटे छोटे शारीरिक व्यायाम कसे करावे याचेही प्रात्यक्षिक करून घेतले.तसेच मेजर ध्यानचंद यांचे कार्य व त्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडला डॉ. अरुण शिंदे यांनी बोलत असताना मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न मिळावा अशी सर्वांनी मागणी करूया असे आवाहन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.खाडे यांनी दिला तर प्रस्तावना प्रा. वांजोळे यांनी केली. या कार्यक्रमाचे आभार प्रा. दूधभाते यांनी मांडले. या कार्यक्रमास प्राचार्य सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंधारे यांनी केली

Previous articleदिघीतील स्नेहछाया परिवारात पार पडले ‘अनोखे रक्षाबंधन
Next articleबी.जे.एस.उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा