Home Blog Page 87

दौंड – सहजपूर फाटा ते राहू रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा नाहीतर आंदोलन करणार- सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे

कुरकुंभ ,सुरेश बागल

दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा ते फिल्टगार्ड कंपनी तसेच कंपनी – दहीटणे – राहू पर्यंतच्या रस्त्यावर भरपूर प्रमाणात मोठे मोठे खड्डे-साईडपटया उखडल्या आहेत. तरीही १०-१५ दिवसांच्या फरकाने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे दौंडचे अभियंता माळशिखरे -यवतचे शिंदे सांगूनही अधिकारी आज – उद्या खड्डे बुजविण्याचे फक्त आश्वासन देतात. तसेच ज्या ठेकेदाराने सहजपूरफाटा ते पाटेठान पर्यंतच्या रस्त्यांचे काम ३-४ वर्षांपूर्वी ५ कोटींना घेतलें होते.

तसेच रस्त्यांच्या डागडुजीची ५ वर्ष ठेकेदारांची जबाबदारी असतानाही दुर्लक्ष केले जात आहे .तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने लक्ष घालून सहजपूर फाटा ते पाटेठान-राहू पर्यंतच्या रस्त्यावरील गुडघाभर मोठे- मोठे खड्डे पडले आहेत. तरीही सहजपूर फाटा ते फिल्टगार्ड कंपनीपर्यंत मोठमोठे खड्डे असल्याने दिवसा – रात्रीच्या वेळी टु व्हीलर गाड्यांवर प्रवास करणाऱ्या शेतकरी, कामगार आणि वाटसरू लोकांना खड्डे असल्याने मोठ्या गाड्यामुळे लहान गाड्यांचा रोजच अपघात घडत आहेत त्यामुळे काही शेतकरी -कामगाराचा अपघातात जीव गेलेला आहे काही लोकांना अपंगत्व आले आहे, तरीही लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत तसेच आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत ज्या ज्या लोकांना या रस्त्यावर जीव गमवावा लागला आहे त्यांना यवतच्या शिंदे साहेबांनी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच मागणी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर दौंड – यवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आॅफिससमोर सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे आंदोलन करणार आहे.

घोडेगाव पोलिस स्टेशनचे दबंग अधिकारी api जीवन माने यांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना ‘Big Salute Award’ प्राप्त

घोडेगाव : -मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना ‘Big Salute Award’ प्राप्त झाला आहे

घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घोडेगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या साठी अनेक लोकाभिमुख उपक्रम सुरू करून अनेक अवघड व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केली.

अवैध्य व्यवसायावर व गुन्हेगारांच्यावर प्रभावी कारवाया केल्या त्यांच्या सर्वसमावेशक कामगिरीमुळेच त्यांना आज अमिताभ गुप्ता आयुक्त पुणे शहर, यांच्या उपस्थितीत डॉक्टर अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या हस्ते ‘Big Salute Award’ देवून गौरविण्यात आले.

“संत निरंकारी मिशन द्वारे हरित विश्वाकडे एक अर्थपूर्ण पाऊल”

उरूळीकांचन, पुणे

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशन द्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ २१ ऑगस्ट, २०२१ रोजी करण्यात आला . तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण भारतातील अनेक राज्यांच्या विविध शहरांमध्ये दिवसेंदिवस या वृक्ष लागवडीच्या संख्येमध्ये वाढ होत आहे .

या परियोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील नानगाव ब्रँच मधील खुटबाव, लोणावळा ब्रँच मधील कामशेत, पाषाण (सुतारवाडी), कोरेगाव मुळ येथे १५००० पेक्षा अधिक वृक्ष लावण्यात आले आहेत. या वर्षी देखील मिशनच्या माध्यमातून १४ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या विविध शहरांमध्ये अनेक नव्या ठिकाणाचा समावेश होत आहे . यादिवशी पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन येथील भवरापूर या ठिकाणच्या वननेस -वन प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. वन विभागाकडून वृक्षारोपण करण्यासाठी या ठिकाणी ५७ एकर जमीन उपलब्ध झाली असून आजच्या दिवशी आठ एकरमध्ये १५००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील या कार्यामध्ये खूप सहयोग लाभत आहे.

संत निरंकारी मिशनचे श्री.ताराचंद करमचंदानी पुणे झोनचे क्षेत्रीय प्रभारी, सेवादलाचे क्षेत्रीय संचालक, संयोजक तसेच स्थानिक प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादलचे स्थानिक अधिकारी व स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम करुन वृक्षारोपणासाठी जमिनीचे सपाटीकरण करणे, खड्डे खोदणे तसेच पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे कार्य गेले आठ दिवस करत आहेत. संत निरंकारी मिशनचे सेवादार वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे त्यांची देखभाल करतील. त्यामध्ये वृक्षांचे रक्षण, खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादिंचा समावेश आहे.

हे सर्व विदित आहे की, संत निरंकारी मिशन हे एक विश्वस्तरीय आध्यात्मिक व्यासपीठ आहे जे सर्वांभूती निराकार ईश्वराची अनुभूती बाळगून प्रेम, सहिष्णुता व सद्भावपूर्ण एकत्वाच्या विचारधारेमध्ये विश्वास बाळगते. मिशनमार्फत पर्यावरण सुरक्षेसाठी सातत्याने कार्य करण्यात येत आहे. वेळोवेळी देशभर वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण, जल संरक्षण, घनकचरा प्रबंधन (Waste Management) आणि प्लास्टिकचा उपयोग न करणे यांसारख्या अभियानांमध्ये पुढाकार घेत आले आहे.

नर्मदे हर ग्रुपच्या वतीने घोडेगाव पोलीस स्टेशनला सूचना फलकांचे वितरण

घोडेगाव –  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी श्रावणी यात्रे निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गेले दोन वर्षात कोरोनामुळे भाविकांचे दर्शन झाले नाही त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे गर्दी पहावयास मिळत आहे यातूनच प्रत्येकाला लवकर दर्शन व्हावे हीच अपेक्षा असते यातून अनेक वेळा पोलिस प्रशासना बरोबर भाविकांचे वाद होत असतात हे वाद टाळले जावे यासाठी घोडेगाव येथील नर्मदे हर ग्रुप परिवाराच्यावतीने पुढाकार घेऊन नियमांचे पालन करण्यासाठी असलेल्या सूचना फलकाचे वितरण यावेळी घोडेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आले त्यामुळे किमान प्रत्येक भाविकाला पोलिसांकडून वेगळी सूचना द्यावी लागणार नाही

यावेळी नर्मदे हर ग्रुपचे अध्यक्ष विनोद काळे सर, घोडेगाव पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने ,घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे ,कपिल काळे,अक्षय काळे,धनंजय काळंबे, नरेंद्र काळे,अंकुश काळे,पोलिस संपत कायगुडे तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते

जयहिंद इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दिल्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी राख्या

नारायणगांव ,किरण वाजगे

कुरण (ता. जुन्नर) येथील जयहिंद इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या धामनखेल येथील नंदनवन या दिव्यांग मुलांच्या आश्रमाला भेट देण्यात आल्या.

शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या राखी बनवा या उपक्रमांतर्गत ३५० राख्या तयार करण्यात आल्या होत्या. या उपक्रमातून दिव्यांग विद्यार्थी व सामान्य विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा बंध निर्माण होतो. तसेच शाळेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनांचा विकास होतो म्हणून असे सहशालेय उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे मत जयहिंद इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य डॉ. किरण पैठणकर यांनी व्यक्त केले.

या उपक्रमासाठी सुप्रिया पांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाकरीता संचालिका अंजली गुंजाळ, इंदूमती गुंजाळ, डॉ. शुभांगी गुंजाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन

नारायणगाव : (किरण वाजगे)

ग्रामपंचायत नारायणगाव (ता. जुन्नर) यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव २०२२ निमित्त जिल्हा परिषदेच्या एकुण ९ प्राथमिक शाळांनी सहभाग घेऊन विविध स्पर्धेत एकूण ३५० विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

या निमित्ताने हस्ताक्षर, चित्रकला व मैदानी खेळांचे आयोजन आज दिनांक १२/०८/२०२२ रोजी मुक्ताई समाज मंदिर कार्यालय नारायणगाव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास एकूण ९ शाळांमधील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेचे विषय “ध्वजाचे चित्र काढून रंगवणे” यात अस्मिता राजेंद्र कोल्हे, राशीद हदीस मन्सुरी, किरण ज्ञानेश्वर कोल्हे, तसेच मोठ्या गटात मुस्कान अब्दुल मतीन, मुस्कान कमल अन्सारी, शेहनाज अ.खालिद अन्सारी, यांचे क्रमांक आले.

हस्ताक्षर स्पर्धेत खुशी गजानन जाधव, यश दादासाहेब शिंदे, स्वरा राजेंद्र वाजगे, अर्पिता श्रीनिवास वाकोडे, देवयानी राजेंद्र शिंदे, सहजार मनोवर मन्सुरी, मुस्कान कमाल अन्सारी, मोहम्मद अली जुबेर अन्सारी तसेच मैदानी खेळ दोरी उडी यात नुपूर रविंद्र नघे यांनी प्राविण्य मिळविले. त्यांना प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी स्वरूपात बक्षीसे देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटे, उपसरपंच आरिफ आतार, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे ,सदस्य संतोष दांगट, राजेश बाप्ते, संतोष पाटे, गणेश पाटे, अक्षय वाव्हळ. उपस्थित होते.
तसेच शाळेचे शिक्षक महादेव खैरे, किरण गावडे, मो.आजम, अखिल नळगीकर, इरफान खान, भाग्यश्री बेलवटे, कीर्ती चव्हाण, शकीला पटेल, सय्यदाबानो अब्बासअली, किशोरी तोडकर, वर्षा हांडे, झोडगे मॅडम, पवार मॅडम, हाडवळे मॅडम, डुंबरे मॅडम, ढेरंगे मॅडम, यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे आभार गणेश पाटे यांनी मानले.

युवासेनेच्या युवतींनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण केला साजरा

घोडेगाव- हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळसाहेब ठाकरे व शिवसेना कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली युवासेना आंबेगाव तालुकांच्या युवतींनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

या सणानिमित आपल्या सर्वांना २४ तास सुरक्षा पुरवण्यासाठी कटिबध्द असणारे मंचर व घोडेगाव पोलिस बांधवांना राखी बांधून त्यांचा आदर व्यक्त केला .

यावेळी आंबेगाव तालुका युवती अधिकारी निलमताई गावडे . निलम मेचकर, माधुरी अंकुश, गायत्री काळे, काजल गावडे, अंकिता तोत्रे, रूपाली अंकुश, सोनाली फदाले आदि युवती पद अधिकारी उपस्थित होत्या.

हर घर तिरंगा अभियानातंर्गत पोलिसांच्या धावण्याच्या स्पर्धेत अमीर शेख प्रथम

दिनेश पवार ,दौंड

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौंड,दौंड पोलीस स्टेशन व यवत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानातंर्गत आयोजित दहा किमी धावण्याच्या स्पर्धेत पोलीस कर्मचारी अमीर शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला,बोरावके नगर ते दौंड शुगर या दरम्यान झालेल्या या स्पर्धेत 50 पोलिसांनी यात 5 पोलीस अधिकारी,दोन महिला कर्मचारी यांनी भाग घेतला होता.

या स्पर्धेत अमीर शेख यांनी प्रथम,संदीप जाधव द्वितीय,सुभाष डोईफोडे तृतीय यांनी क्रमांक पटकावले,विजेत्यांना दौंड मधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.डी.एस.लोणकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.यावेळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते

शिंदेवाडी येथे तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

उरुळी कांचन

हवेली तालुक्यातील शिंदेवाडी येथील गायरानावर हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते लक्ष्मितरू वृक्षाचे वृक्षारोपण करुन वृक्ष लागवड करण्यात आले. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून शाश्वत विकास फाउंडेशन ग्रामपंचायत शिंदेवाडी ग्रामपंचायत हिंगणगाव कृषी विभाग महसूल विभाग यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी २५१ वृक्षांचे वृक्षारोपण केले.

रिमझिम पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या या पावसाचा आनंद घेत तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील व सर्व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करण्याचा आनंद घेतला. यावेळी महिलांनी वृक्षांना राखी बांधून वृक्षारोपण केले.

यावेळी वृक्षारोपण कार्यामध्ये अनमोल सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूजचे संचालक अशोक घावटे , उपसंपादक राजेंद्र शिंदे, ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप, मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद, शिंदेवाडीचे सरपंच संदीप जगताप, भवरापुरचे सरपंच सचिन सातव, सांगवीचे सरपंच नरसिंग लोले, हिंगणगावच्या सरपंच विद्या सागर थोरात, मंडल कृषी अधिकारी गणेश सुरवसे, कृषी अधिकारी नीलम कासारे, शिंदेवाडीच्या ग्रामसेविका मोनिका माझीरे, हिंगणगावच्या ग्रामसेविका सुवर्णा लोंढे, आर्ट ऑफ लिविंगचे साधक अजित रणसिंग, अष्टापुरचे तलाठी सुधीर जायभाय, कोरेगावमूळचे तलाठी प्रदीप जवळकर, सोरतापवाडीचे तलाठी निवृत्ती गवारी, शाश्वत विकास फाउंडेशनचे सदस्य रघुनाथ हरपळे, विजय थोरात, राहुल थोरात, जयमाला जगताप यांच्यासह शाश्वत फाउंडेशन अध्यक्ष प्रभाकर जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात आदिवासींचे योगदान- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

उरुळी कांचन

९ ऑगस्ट ७५ व्या आमृत महोत्सवी आदिवासी दिन संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आदिवासींचे योगदान फार मोलाचे आहेत असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव व गुणगौरव कार्यक्रम आदिवासी विकास विभाग नागपूर येथील कार्यक्रमात भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या वेळी महाराष्ट्रामध्ये व देशात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व आदिवासी आयुक्त रविंद्र ठाकूर, यांच्या हस्ते आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांना सन्मानित करण्यात आले. सत्कार स्विकारताना नामदेव भोसले व शेवराई ज्ञानदेव भोसले,भास्कर भोसले, ॠतुजा भोसले, शोभा भोसले हे उपस्थित होते.

स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता “मराशी” या पुस्तकाद्वारे भारतातील आदिवासी पारधी भाषा लिखित स्वरूपात आणले व आदिवासींसाठी हिताचे उल्लेखनीय भरीवदार काम साहित्यिक नामदेव भोसले यांनी केले आहे, म्हणून नामदेव भोसले, भास्कर भोसले यांना सन्मानित करण्यात आले.