हर घर तिरंगा अभियानातंर्गत पोलिसांच्या धावण्याच्या स्पर्धेत अमीर शेख प्रथम

दिनेश पवार ,दौंड

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौंड,दौंड पोलीस स्टेशन व यवत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानातंर्गत आयोजित दहा किमी धावण्याच्या स्पर्धेत पोलीस कर्मचारी अमीर शेख यांनी प्रथम क्रमांक पटकावला,बोरावके नगर ते दौंड शुगर या दरम्यान झालेल्या या स्पर्धेत 50 पोलिसांनी यात 5 पोलीस अधिकारी,दोन महिला कर्मचारी यांनी भाग घेतला होता.

या स्पर्धेत अमीर शेख यांनी प्रथम,संदीप जाधव द्वितीय,सुभाष डोईफोडे तृतीय यांनी क्रमांक पटकावले,विजेत्यांना दौंड मधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.डी.एस.लोणकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.यावेळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते

Previous articleशिंदेवाडी येथे तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
Next articleयुवासेनेच्या युवतींनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण केला साजरा