युवासेनेच्या युवतींनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण केला साजरा

घोडेगाव- हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळसाहेब ठाकरे व शिवसेना कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली युवासेना आंबेगाव तालुकांच्या युवतींनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

या सणानिमित आपल्या सर्वांना २४ तास सुरक्षा पुरवण्यासाठी कटिबध्द असणारे मंचर व घोडेगाव पोलिस बांधवांना राखी बांधून त्यांचा आदर व्यक्त केला .

यावेळी आंबेगाव तालुका युवती अधिकारी निलमताई गावडे . निलम मेचकर, माधुरी अंकुश, गायत्री काळे, काजल गावडे, अंकिता तोत्रे, रूपाली अंकुश, सोनाली फदाले आदि युवती पद अधिकारी उपस्थित होत्या.

Previous articleहर घर तिरंगा अभियानातंर्गत पोलिसांच्या धावण्याच्या स्पर्धेत अमीर शेख प्रथम
Next articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन