घोडेगाव पोलिस स्टेशनचे दबंग अधिकारी api जीवन माने यांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना ‘Big Salute Award’ प्राप्त

घोडेगाव : -मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना ‘Big Salute Award’ प्राप्त झाला आहे

घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी घोडेगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या साठी अनेक लोकाभिमुख उपक्रम सुरू करून अनेक अवघड व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केली.

अवैध्य व्यवसायावर व गुन्हेगारांच्यावर प्रभावी कारवाया केल्या त्यांच्या सर्वसमावेशक कामगिरीमुळेच त्यांना आज अमिताभ गुप्ता आयुक्त पुणे शहर, यांच्या उपस्थितीत डॉक्टर अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या हस्ते ‘Big Salute Award’ देवून गौरविण्यात आले.

Previous article“संत निरंकारी मिशन द्वारे हरित विश्वाकडे एक अर्थपूर्ण पाऊल”
Next articleदौंड – सहजपूर फाटा ते राहू रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा नाहीतर आंदोलन करणार- सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे