Home Blog Page 88

झाडांना राख्या बांधून साजरे करण्यात आले वृक्ष रक्षाबंधन

नारायणगाव, किरण वाजगे

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वारूळवाडी (ता.जुन्नर) येथे झाडांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे निसर्ग आणि पर्यावरण यांचा थेट संबंध आपल्या जीवनशैलीशी आहे. खरंतर, झाडे म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान आणि बहुमोल अशी भेटचं आहे. शिवाय, झाडे म्हणजे आपल्या जीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहेत. झाडे आपल्या आयुष्यात इतकी महत्वाची आहेत की त्यांच्याशिवाय आयुष्य जगण्याची कुणीही कल्पना सुद्धा करू शकत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे झाडे आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देतात. झाडांचे आपण रक्षण केले तरच झाडे आपले रक्षण करतील.असे प्रतिपादन वारूळवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख माधुरी शेलार यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी वारुळवाडी गावाचे प्रथम नागरिक-सरपंच राजेंद्र मेहेर ,ग्रा.प.सदस्य जंगलभाऊ कोल्हे,तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवदत्त-मामा संते,ग्रामविकास अधिकारी सतिश गवारी, श्रीकांत आल्हाट,विशेष शिक्षिका संगिता डोंगरे,शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा डोंगरे ,विद्यार्थी,शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

वारूळवाडी गावचे सरपंच राजेंद्र मेहेर म्हणाले की, वन ट्री चॅलेन्ज ही संकल्पना सर्व नागरिकांनी जरूर राबवावी.पर्यावरणाची कशी हाणी होत आहे, याबद्दल पुस्तकेच्या पुस्तके लिहिली गेली आहेत, माहितीपट बनले आहेत, आंदोलने झाली आहेत… पण जोपर्यंत प्रत्येक माणसाला हा विषय आपला वाटत नाहीत. तोपर्यंत जगभरातील सत्ताधीशांना याचे महत्त्व पटणार नाही. त्यासाठी ‘वन ट्री चॅलेन्ज’! म्हणजे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक तरी झाड लावून त्याचे मोठे होई पर्यंत संवर्धन करावे. आपल्यातील प्रत्येकाला ‘वन ट्री चॅलेन्ज’ स्वीकारावेच लागेल.यासाठी प्रत्येक मुलाने तयार केलेले सीड बॉल मोकळ्या जागी योग्य प्रकारे खड्डा घेऊन लावावेत.

शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आणि शाळेतील शिक्षिका यांनी झाडांचे महत्त्व विषद केले. आपण सर्वांनी शाळेत असल्यापासून “झाडे लावा, झाडे जगवा” हा सुविचार अनेक वेळा ऐकला आहे. झाडे आपल्या जीवनाचा सार आहेत. झाडांशिवाय पृथ्वीवरील सजीवसृष्टीची कल्पना करणे देखील व्यर्थ ठरेल. जिथे शक्य असेल तिथेतिथे वड, पिंपळ, चिंच, जांभूळ असे वृक्ष लावायला हवेत आणि जगवायला हवेत. आपण लावलेली ही झाडे भविष्यात इतर संकटाशी सामना करण्याची नवी उमेद देतात .सर्व वनस्पती या पृथ्वीवरील अमूल्य ठेवा आहेत. शिवाय, वृक्षांमुळेच माणसाला त्याच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक असलेली संसाधने प्राप्त होतात. जर झाडे नसतील तर पर्यावरणाचा सगळा समतोल बिघडेल.जर झाडे तोडण्यासोबतच मानवाने नवीन रोपांची लागवड केली नाही तर, आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टी संकटात येईल . कित्येक शतकानुशतके झाडे सजीवांच्या जीवनाचा अविभाज्य असा भाग आहेत.जगाची तापमानवाढ रोखायची असेल तर कार्बन डायऑक्साइचे उत्सर्जन कमी करायला हवे. कार्बन शोषून घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा करणारे झाड नावाचं एक नैसर्गिक यंत्र आपल्याकडे आहे. अगदी प्राचीन काळाच्या पाषाण युगापासून ते आजच्या विज्ञान युगापर्यंत सर्व जीव हे वनस्पतींवर अवलंबून आहेत. पृथ्वीवर पावसाचे आगमन सजीवसृष्टीला ऑक्सिजन झाडांमुळे मिळते. प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे आपल्याला खूप उपयुक्त ठरतात.म्हणून आपण झाडांचे आपण रक्षण केले तर झाडे आपले रक्षण करतील.झाडे कधीच न तोडण्याची व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेण्याची प्रतिज्ञा मुलांना घेतली आली.

कार्यक्रमाची व्यवस्था स्वाती शिंदे , वैशाली वामन ,प्रतिमा नलावडे,अनिता साबळे यांनी केली.
प्रास्ताविकातून संपूर्ण कार्यक्रमाची माहिती मुख्याध्यापिका शोभा डोंगरे यांनी दिली.

संतुलन संस्थेत संविधानास राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा

गणेश‌,सातव – वाघोली

रक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावास राखी बांधून आयुष्यभर स्वतःचे रक्षण करण्यासाठी भावाकडून घेतलेली हमी.परंतु खऱ्या अर्थाने या भारत देशाचे संविधान हाच आपला रक्षण करता मोठा भाऊ असून त्याचे पूजन करून आणि त्याला राखी बांधून वंचितांच्या न्याय हक्कासाठी रचनात्मक पद्धतीने पंचवीस वर्ष संघर्ष करणाऱ्या संतुलन संस्थेमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

संविधानाचे पूजन व औक्षण करून त्यास राखी बांधून महिला भगिनी व विद्यार्थ्यांनी स्वतः बरोबर देश रक्षणासाठी प्रार्थना केली. “बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी, राखी बांधून संविधानास देश संविधानाच्या हाती” म्हणत उत्सव साजरा केला.

महिलांनी पारंपारिक पद्धतीबरोबरच आजच्या आधुनिक पद्धतीने देश सेवेची जबाबदारी ओळखून आपले कार्य करावे, तसेच या वर्षी अमृत महोत्सव साजरा करतांना हर घर तिरंगा बरोबरच हर घर संविधान सुद्धा महत्वाचे आहे असे विचार संतुलन संस्थेचे संस्थापक अँड.बी.एम.रेगे यांनी मांडले. त्याच्या संकल्पनेतून आणि संचालिका अँड. पल्लवी रेगे यांच्या मार्गदर्शनातून दगडखाण आणि कष्टकरी कामगारांच्या शुभहस्ते खराडी येथील तुळजाभवानी नगर येथे संतुलन भवन मध्ये साजरा करण्यात आला.

या प्रसंगी दगडखाण कामगार परिषदेचे पदाधिकारी,संतुलन पतसंस्था,संतुलन महिला कष्टकरी परिषद, संतुलन पाषाण शाळा शिक्षक वृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ चांदणे यांनी तर आभार अँड. पल्लवी रेगे यांनी मानले.

नारायणगाव पोलिस स्थानकात रोटरी क्लबच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव रोटरी क्लब च्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून नारायणगाव पोलीस स्टेशन मधील पोलिस बांधवांना राखी बांधून, औक्षण करुन व पेढे भरवूनअनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

पोलीस हे २४ तास ऑन ड्युटी असतात त्यांना कोणताच सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करता येत नाही. आपल्या रक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सामाजीक बांधिलकीच्या दृष्टीकोणातून रक्षाबंधन’ सारखे सण साजरे करण्यात येतात. असे रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. हनुमंत भोसले यांनी सांगितले.


या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे, विनोद दुर्वे यांनी देखील मनोगत व्यक्त करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात रो डॉ. रामदास उदमले, रो. योगेश भिडे, रो. सचीन घोडेकर, रो. अनिल मालानी , रो. कवलजीतसिंग बांगा, रो. Ann, प्रिया कामत, प्रिया घोडेकर, .सिमा महाजन, आशा डहाळे , रेखा ब्रम्हे, मंजुश्री लोखंडे, सुनिता बोरा, सुनंदा मालानी, अमृता भिडे, केतकी काचळे, निर्मला मेहेर, अनिता उदमले, मिता डोके, सुनिता वाघ आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना डाँ.सवीता भोसले यांनी केली. सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले. तर आभार सुनिता बोरा व सुनंदा मालानी यांनी मानले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा.डॉ.गौतम बेंगाळे यांना प्रदान

दिनेश पवार:दौंड

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय संचालक प्रा.डॉ. गौतम बेंगाळे यांना राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिदिनी’ आयोजिलेल्या नवव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपात प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ जलतज्ज्ञ अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब गार्डी आणि परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते,या कार्यक्रमात प्रा.डॉ. बंडोपंत कांबळे (औंध), प्रा. व्ही. बी. फसाले (मंचर), प्रा. एस. टी. पोकळे (मंचर), प्रा. के. बी. एरंडे (मंचर), अंबादास रोडे (मुळशी), प्रीती जगझाप (चंद्रपूर), संदीप राठोड (निघोज), चंदन तरवडे (कोपरगाव), विद्या गायकवाड (अहमदनगर) आणि महेश भोर (मंचर) या शिक्षकांना बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले तर आभार प्रा. बाळासाहेब गार्डी यांनी मानले.

उरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात २००० – २०२१ बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

उरुळी कांचन

महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन माजी विद्यार्थी मेळावा दहावी २००० -२०२१ बॅचच्या निमित्ताने तब्बल तीनशे माजी विद्यार्थी व तत्कालिन शिक्षक व सेवक वर्ग यांनी सहभाग नोंदवला तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

याप्रसंगी शिक्षकांचा सत्कार करणे, सेवकांचा सत्कार करणे, वृक्षारोपण करणे, शाळेला उपयोगी वस्तु भेट स्वरुपात देणे, गरजु विद्यार्थ्याना फि साठी मदत देणे इत्यादी स्तुत्य उपक्रम घेण्यात आले. पुढील काळात देखिल शाळेला मदत देण्याचे ठरवले आहे. २२ वर्षानंतर हा योग आला असल्याने माजी सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग उपस्थितीत राहून घेतला.

या मेळाव्याचे नियोजन महादेव काकडे, हर्षल टिळेकर, सागर कांचन, सिध्दार्थ शिंदे, प्रकाश धुकटे, आण्णा महाडिक, उमेश कांचन, नितीन लवांडे, सुमीत वनारसे, कैलास पटेल, अशोक गोते, प्रविण जुन्नरकर, औदुबंर वेदपाठक, निखील कोतवाल, संतोष भोसले, रुपेश टेहरे, प्रदिप ससाणे, आसिफ शेख, शर्मीला तुपे, छाया जगताप,प्रिती कांचन,ज्योती नरके, गिता कांचन, शुभांगी गायकवाड, सोनाली खेडेकर, फरीदा शेख, मिनाक्षी बोराटे, भारती कांचन यांनी योगदान दिले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षल टिळेकर, शर्मीला भोसेकर, दिपाली धाउत्रे, विजय कांचन यांनी केले तर स्वागत सागर कांचन व सारीका कांचन यांनी केले. विद्यार्थ्यानां शाळेची आठवण म्हणुन भेट स्वरुपात एक स्मृतिचिन्ह देण्यात आले. आभार महादेव काकडे व भारती कांचन यांनी मानले.

घोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न

घोडेगाव – येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव कार्यक्रमात सहभागी झाले होते विविध क्रांतिकारकांचे वेशभूषा त्याचबरोबर आदिवासी शेतकरी महिला यांचे संस्कृती दर्शन घडवणारे चित्ररथ त्याचबरोबर ढोल लेझीम पथक हे आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते या सर्वांची रॅली द्वारे वनमाला मंगल कार्यालय येथे आगमन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे विक्रीकर उपायुक्त श्री सुधीर घोटकर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर विलास साबळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी बळवंत गायकवाड हे उपस्थित होते.

यावेळी सुभाष मोरमारे ,संजय गवारी ,संजय शेळके ,मारुती लोहकरे ,इंदुबाई लोहकरे, जनाबाई उगले, रूपालीताई जगदाळे गौतम खरात, विजय आढरी, संभाजी पारधी, किसन खामकर, अनिता आढारी, डॉक्टर संजय भवारी हे उपस्थित होते

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाताई मते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र झांजरे यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन काळूराम भवारी तसेच आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती यांनी केले कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्याते म्हणून प्रा डॉक्टर नितीन तळपाडे यांनी आदिवासी संस्कृती विषयी माहिती दिली.

तर व्याख्याते डॉक्टर कृष्णा भवारी यांनी आदिवासींची आव्हाने या विषयावर व्याख्यान दिले कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर पत्रकार विशेष प्राविण्य मिळव नाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाची नियोजन आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती व विविध आदिवासी संघटना यांनी पार पाडले आभार डॉक्टर हरीश खामकर यांनी मांडले

क्रांतीताई गाढवे यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम

घोडेगाव ग्रामपंचायतचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 155 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आंबेगाव तालुक्याचे माजी सभापती कैलासबुवा काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे,उपसरपंच सोमनाथ काळे,माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील इंदोरे,ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील घोडेकर,गणेश वाघमारे, राजेश्वरी काळे,शोभा सोमवंशी, ग्रामविकास अधिकारी धनराज क्षीरसागर,शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सचिन जगदाळे, उपाध्यक्ष प्रमोद अर्विकार,शाहीर सखाराम घोडेकर, मुख्याध्यापिका अलका चासकर उपस्थित होते.

यावेळी कैलासबुवा काळे यांनी इंग्रजी शाळेच्या तुलनेत मराठी शाळेतील विद्यार्थी मागे राहता कामा नये या हेतूने इंग्लिश स्कूल च्या तुलनेत मराठी शाळेकडे चांगल्या प्रकारे लक्ष देण्याचा ग्रामपंचायत घोडेगाव चा उपक्रम स्तुत्य आहे.ग्रामपंचायत माध्यमातून प्राथमिक शाळेत मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत.यावेळी क्रांती गाढवे,सोमनाथ काळे,राजेश्वरी काळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजाराम काथेर सर यांनी केले

भव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

योगेश राऊत , पाटस

साई मल्हार कराटे डो-असोसिएशन ऑफ इंडिया आणि साई मल्हार इंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव चौफुला या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी पुणेसह लातूर, परभणी, अहमदनगर ,सातारा, रायगड ,सांगली, कोल्हापूर सोलापूर या ठिकाणचे एकूण 375 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अशी माहिती स्पर्धा आयोजक प्रा. कैलास महानोर यांनी दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी हाळनोर साहेब उद्घाटक आनंद दादा थोरात यांनी केले. स्वागताध्यक्ष तानाजी तात्या केकान यांनी भूषविले.

या कार्यक्रमांमध्ये आदर्श कराटे प्रशिक्षक पुरस्कार चंद्रकांत राहीज- अहमदनगर, तुषार अवस्त्री- लातूर, सुनील खताळ- सातारा ,सागर आदमाने – संतोष सोनवणे- पुणे, जयश्री पांडकर- बीड, कविता दवणे- सांगली,व तसेच कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक कार्यात काम करणाऱ्या मान्यवरांचा समाज भूषण पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन आनंदा थोरात यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार वितरण करण्यात आले. मानकरी सचिन शिंदे ,सुनील नेटके, डॉ. नवनाथ अडसूळ, संजयजी हाळनोर, स्वप्निल भागवत, उज्वलाताई गोंड, तानाजी केकान यांना देण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सचिन भांडवलकर, संतोष वरघडे,अर्चना पाटील, डॉ.नवनाथ अडसूळ, उपस्थित होते.यावेळी स्वप्नील भागवत सदस्य ग्रामपंचायत पाटस यांनी कराटे खेळाडूंना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम अक्षय धनवटे , हेमंत महानोर, प्रिया राऊत, नक्षत्रा महानोर,तेजश्री गवते, राजेश्वरी ढेबे यांनी घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास महानोर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सचिन राऊत यांनी मानले

दौंड शहरात वारंवार जाणारी लाईट व निकृष्ट कामाची चौकशी व्हावी: दौंड शहर काँग्रेस कमिटी

कुरकुंभ : सुरेश बागल

दौंड शहरात वारंवार जाणारी लाईट यामुळे सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहेत अशा निकृष्ट कामाची चौकशी व्हावी यासाठी मुख्य अभियंता महावितरण कार्यालय दौंड येथे दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले.पावसाळा सुरू होण्यापूर्वी व एप्रिल आणि मे महिन्यात पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी दिवसातून चार ते आठ तास भारनियम करण्यात आले होते. सदर कामे झालेली असताना सुद्धा गेल्या दोन महिन्यापासून दिवसातून पाच ते सहा वेळा लाईट घालवली जात आहे.

वेळोवेळी आंदोलन करून व निवेदन देऊन सुद्धा शहरातील स्थितीत सुधारणा झालेली नाही. यामुळे सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. या निवेदनाद्वारे विनंती करून सांगण्यात आले आहे की, दौंड शहरातील गेल्या तीन महिन्यापासून झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच निकृष्ट साहित्य वापरून काम करणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी. आणि शहरात चांगल्या पद्धतीने काम होण्यासाठी कामाची व येणाऱ्या निधीची माहिती उपलब्ध व्हावी. सदर प्रकरणात लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अन्यथा दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर अध्यक्ष दौंड शहर कॉंग्रेस हरेष ओझा,जिल्हाध्यक्ष पर्यावरण कॉंग्रेस तन्मय पवार,जिल्हा प्रतिनिधी कॉंग्रेस अतुल जगदाळे,तालुका अध्यक्ष युवक कॉंग्रेस श्रेयस मुनोत,अध्यक्ष दौंड शहर अल्पसंख्यक कॉंग्रेस रज्जाक भाई शेख आणि उपाध्यक्ष अल्पसंख्यक कॉंग्रेस सुरेश क्षिरसागर यांनी सह्या केलेल्या आहेत.

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या आमरण उपोषणाला यश

कुरकुंभ, सुरेश बागल

पुणे कामगार उपआयुक्त कार्यालय वाकडेवाडी,शिवाजीनगर येथे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे (संलग्न भारतीय मजदूर संघ) आमरण उपोषण करण्यात आले पुणे झोन मधील पिंपरी विभागातील माहे नोव्हेंबर २०२१ मधील ५ कंत्राटी कामगारांचा,कोथरूड विभाग व पिंपरी विभागातील माहे जुलै २०२१ ते माहे डिसेंबर २०२१ या सहा महिन्यांचा महागाई भत्ता तसेच पुणे ग्रामीण मधील मुळशी विभागाचा माहे मे २०२२ चा पूर्ण पगार,माहे जून २०२२ मधील १७ कंत्राटी कामगारांचा पगार थकीत होता त्यासोबत संघटनेची महत्वपूर्ण मागणी होती की पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरी,पनवेल वाशी,पुणे आणि आता कोल्हापूर येथे मे ऑल ग्लोबल सर्व्हिसेस प्रा ली या ठेकेदाराने धुमाकूळ घातलेला आहे.कामगारांना वेतन न देणे , पगारतुन पैशाची मागणी करणे, ई त्या भ्रष्ट कंत्राटदाराचे लायसन्स जप्त करावे व त्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे या सर्व महत्वपूर्ण मागण्या घेऊन संघटनेने हे बेमुदत आमरण उपोषण सकाळी १०:०० वाजल्यापासून कामगार उपआयुक्त कार्यालय, वाकडेवाडी,शिवाजी नगर येथे चालू केले हे आंदोलन चालू झाल्यानंतर पुणे झोन मधील सर्व कामगारांचे थकीत वेतन व थकीत महागाई भत्ता आज कामगारांच्या खात्यावर जमा झाला दुपारनंतर अपर कामगार आयुक्त श्री अभय गीते यांनी चर्चेला संघटनेला बोलविले. संघटनेने त्या मीटिंग मध्ये आम्हाला पैसे नाही मिळाले तरी चालतील पण पुणे येथे कंत्राट घेवून कामगारांचे पैसे लुबाडनाऱ्या दोषी ऑल ग्लोबल सर्व्हिसेस या कंत्राटदारांवर त्वरित खटला दाखल करा त्याचे लायसन रद्द करा याच कंत्राटदारांने सध्या कोल्हापूर मधील कंत्राटी कामगारांवर देखील अन्याय सुरू केला आहे याचे लायसन रद्द केल्याशिवाय हे बेमुदत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही असे सांगितल्यावर त्यांनी या सर्व गोष्टींची तातडीने दखल घेत कामगार उपायुक्त कार्यालय ने खटले भरण्याची व ऑल ग्लोबल सर्व्हिस या एजेन्सीचे लायसन्स रद्द करण्याबाबतच्या कार्यवाही सुरू केल्या आहेत असे सांगितले तसे लेखी मिनिट्सही कामगार कार्यालयातून संघटनेला देतो असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आणि तसे लेखी मिनिट्सही त्यांनी संघटनेला दिले व आमरण उपोषण मागे घ्यावे असे आव्हान त्यांनी केल्यामुळे आजचे यशस्वी आमरण उपोषण भारतीय मजदूर संघ व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या उपस्थित मागे घेण्यात आले .

या वेळी झालेल्या सभेत महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी वीज क्षेत्रातील, ईतर क्षेत्रातील कंत्राटदारांनी कामगारांना त्रास, मानसिक, आर्थिक लुटमार करू नये अन्यथा महाराष्ट्रातील सर्व लेबर आॅफीस समोर कंत्राटी कामगारांचे लढे पुकारणार असुन या संघर्षात सर्व कंत्राटी कामगारांनी एकजुटीने सहभागी होवून ऐका ऐतिहासिक लढ्यात सहभागी व्हावे असे आवहान केले आहे.

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष श्री नीलेश खरात यांनी शासनाने दखल घेऊन सर्व कंत्राट दार मुक्त करण्यासाठी कंत्राटी कामगारांना D B T पध्दतीने कामगारांना वेतन दिले पाहिजे. व शास्वत रोजगार द्यावा. या करिता लवकरच मा मुख्यमंत्री, व मा उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे असे सांगितले आहे.

आजच्या या यशस्वी आंदोलनाला भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हाअध्यक्ष मा.श्री.अर्जुनजी चव्हाण यांनी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे संघटन मंत्री श्री राहुल बोडके यांना प्रातिनिधिक स्वरूपात ज्युस देवुन उपोषणची सांगता केली.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे( संलग्न भारतीय मजदूर संघ) प्रदेश अध्यक्ष .श्री. निलेश खरात, सरचिटणीस .श्री.सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष . उमेश आनेराव, संघटनमंत्री राहुल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार,पुणे झोन अध्यक्ष मा.श्री.सुमित कांबळे,निखील टेकवडे, व पुणे झोनचे इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी कोथरुड व मूळशी डिव्हिजन येथील सर्व कामगार सहभागी झाले होते.