क्रांतीताई गाढवे यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम

घोडेगाव ग्रामपंचायतचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 155 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आंबेगाव तालुक्याचे माजी सभापती कैलासबुवा काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे,उपसरपंच सोमनाथ काळे,माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील इंदोरे,ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील घोडेकर,गणेश वाघमारे, राजेश्वरी काळे,शोभा सोमवंशी, ग्रामविकास अधिकारी धनराज क्षीरसागर,शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सचिन जगदाळे, उपाध्यक्ष प्रमोद अर्विकार,शाहीर सखाराम घोडेकर, मुख्याध्यापिका अलका चासकर उपस्थित होते.

यावेळी कैलासबुवा काळे यांनी इंग्रजी शाळेच्या तुलनेत मराठी शाळेतील विद्यार्थी मागे राहता कामा नये या हेतूने इंग्लिश स्कूल च्या तुलनेत मराठी शाळेकडे चांगल्या प्रकारे लक्ष देण्याचा ग्रामपंचायत घोडेगाव चा उपक्रम स्तुत्य आहे.ग्रामपंचायत माध्यमातून प्राथमिक शाळेत मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत.यावेळी क्रांती गाढवे,सोमनाथ काळे,राजेश्वरी काळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजाराम काथेर सर यांनी केले

Previous articleभव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न
Next articleघोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न