घोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न

घोडेगाव – येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव कार्यक्रमात सहभागी झाले होते विविध क्रांतिकारकांचे वेशभूषा त्याचबरोबर आदिवासी शेतकरी महिला यांचे संस्कृती दर्शन घडवणारे चित्ररथ त्याचबरोबर ढोल लेझीम पथक हे आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते या सर्वांची रॅली द्वारे वनमाला मंगल कार्यालय येथे आगमन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे विक्रीकर उपायुक्त श्री सुधीर घोटकर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर विलास साबळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी बळवंत गायकवाड हे उपस्थित होते.

यावेळी सुभाष मोरमारे ,संजय गवारी ,संजय शेळके ,मारुती लोहकरे ,इंदुबाई लोहकरे, जनाबाई उगले, रूपालीताई जगदाळे गौतम खरात, विजय आढरी, संभाजी पारधी, किसन खामकर, अनिता आढारी, डॉक्टर संजय भवारी हे उपस्थित होते

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाताई मते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र झांजरे यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन काळूराम भवारी तसेच आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती यांनी केले कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्याते म्हणून प्रा डॉक्टर नितीन तळपाडे यांनी आदिवासी संस्कृती विषयी माहिती दिली.

तर व्याख्याते डॉक्टर कृष्णा भवारी यांनी आदिवासींची आव्हाने या विषयावर व्याख्यान दिले कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर पत्रकार विशेष प्राविण्य मिळव नाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाची नियोजन आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती व विविध आदिवासी संघटना यांनी पार पाडले आभार डॉक्टर हरीश खामकर यांनी मांडले

Previous articleक्रांतीताई गाढवे यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम
Next articleउरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात २००० – २०२१ बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न