उरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात २००० – २०२१ बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

उरुळी कांचन

महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन माजी विद्यार्थी मेळावा दहावी २००० -२०२१ बॅचच्या निमित्ताने तब्बल तीनशे माजी विद्यार्थी व तत्कालिन शिक्षक व सेवक वर्ग यांनी सहभाग नोंदवला तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

याप्रसंगी शिक्षकांचा सत्कार करणे, सेवकांचा सत्कार करणे, वृक्षारोपण करणे, शाळेला उपयोगी वस्तु भेट स्वरुपात देणे, गरजु विद्यार्थ्याना फि साठी मदत देणे इत्यादी स्तुत्य उपक्रम घेण्यात आले. पुढील काळात देखिल शाळेला मदत देण्याचे ठरवले आहे. २२ वर्षानंतर हा योग आला असल्याने माजी सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग उपस्थितीत राहून घेतला.

या मेळाव्याचे नियोजन महादेव काकडे, हर्षल टिळेकर, सागर कांचन, सिध्दार्थ शिंदे, प्रकाश धुकटे, आण्णा महाडिक, उमेश कांचन, नितीन लवांडे, सुमीत वनारसे, कैलास पटेल, अशोक गोते, प्रविण जुन्नरकर, औदुबंर वेदपाठक, निखील कोतवाल, संतोष भोसले, रुपेश टेहरे, प्रदिप ससाणे, आसिफ शेख, शर्मीला तुपे, छाया जगताप,प्रिती कांचन,ज्योती नरके, गिता कांचन, शुभांगी गायकवाड, सोनाली खेडेकर, फरीदा शेख, मिनाक्षी बोराटे, भारती कांचन यांनी योगदान दिले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षल टिळेकर, शर्मीला भोसेकर, दिपाली धाउत्रे, विजय कांचन यांनी केले तर स्वागत सागर कांचन व सारीका कांचन यांनी केले. विद्यार्थ्यानां शाळेची आठवण म्हणुन भेट स्वरुपात एक स्मृतिचिन्ह देण्यात आले. आभार महादेव काकडे व भारती कांचन यांनी मानले.

Previous articleघोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा.डॉ.गौतम बेंगाळे यांना प्रदान