डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा.डॉ.गौतम बेंगाळे यांना प्रदान

दिनेश पवार:दौंड

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पुणे विभागीय संचालक प्रा.डॉ. गौतम बेंगाळे यांना राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिदिनी’ आयोजिलेल्या नवव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपात प्रा. डॉ. गौतम बेंगाळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ जलतज्ज्ञ अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब गार्डी आणि परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते,या कार्यक्रमात प्रा.डॉ. बंडोपंत कांबळे (औंध), प्रा. व्ही. बी. फसाले (मंचर), प्रा. एस. टी. पोकळे (मंचर), प्रा. के. बी. एरंडे (मंचर), अंबादास रोडे (मुळशी), प्रीती जगझाप (चंद्रपूर), संदीप राठोड (निघोज), चंदन तरवडे (कोपरगाव), विद्या गायकवाड (अहमदनगर) आणि महेश भोर (मंचर) या शिक्षकांना बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले तर आभार प्रा. बाळासाहेब गार्डी यांनी मानले.

Previous articleउरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात २००० – २०२१ बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
Next articleनारायणगाव पोलिस स्थानकात रोटरी क्लबच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम