नारायणगाव पोलिस स्थानकात रोटरी क्लबच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव रोटरी क्लब च्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून नारायणगाव पोलीस स्टेशन मधील पोलिस बांधवांना राखी बांधून, औक्षण करुन व पेढे भरवूनअनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

पोलीस हे २४ तास ऑन ड्युटी असतात त्यांना कोणताच सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करता येत नाही. आपल्या रक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सामाजीक बांधिलकीच्या दृष्टीकोणातून रक्षाबंधन’ सारखे सण साजरे करण्यात येतात. असे रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. हनुमंत भोसले यांनी सांगितले.


या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे, विनोद दुर्वे यांनी देखील मनोगत व्यक्त करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात रो डॉ. रामदास उदमले, रो. योगेश भिडे, रो. सचीन घोडेकर, रो. अनिल मालानी , रो. कवलजीतसिंग बांगा, रो. Ann, प्रिया कामत, प्रिया घोडेकर, .सिमा महाजन, आशा डहाळे , रेखा ब्रम्हे, मंजुश्री लोखंडे, सुनिता बोरा, सुनंदा मालानी, अमृता भिडे, केतकी काचळे, निर्मला मेहेर, अनिता उदमले, मिता डोके, सुनिता वाघ आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना डाँ.सवीता भोसले यांनी केली. सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले. तर आभार सुनिता बोरा व सुनंदा मालानी यांनी मानले.

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा.डॉ.गौतम बेंगाळे यांना प्रदान
Next articleसंतुलन संस्थेत संविधानास राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा