दौंड शहरात वारंवार जाणारी लाईट व निकृष्ट कामाची चौकशी व्हावी: दौंड शहर काँग्रेस कमिटी

कुरकुंभ : सुरेश बागल

दौंड शहरात वारंवार जाणारी लाईट यामुळे सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहेत अशा निकृष्ट कामाची चौकशी व्हावी यासाठी मुख्य अभियंता महावितरण कार्यालय दौंड येथे दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले.पावसाळा सुरू होण्यापूर्वी व एप्रिल आणि मे महिन्यात पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी दिवसातून चार ते आठ तास भारनियम करण्यात आले होते. सदर कामे झालेली असताना सुद्धा गेल्या दोन महिन्यापासून दिवसातून पाच ते सहा वेळा लाईट घालवली जात आहे.

वेळोवेळी आंदोलन करून व निवेदन देऊन सुद्धा शहरातील स्थितीत सुधारणा झालेली नाही. यामुळे सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत. या निवेदनाद्वारे विनंती करून सांगण्यात आले आहे की, दौंड शहरातील गेल्या तीन महिन्यापासून झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच निकृष्ट साहित्य वापरून काम करणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी. आणि शहरात चांगल्या पद्धतीने काम होण्यासाठी कामाची व येणाऱ्या निधीची माहिती उपलब्ध व्हावी. सदर प्रकरणात लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अन्यथा दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर अध्यक्ष दौंड शहर कॉंग्रेस हरेष ओझा,जिल्हाध्यक्ष पर्यावरण कॉंग्रेस तन्मय पवार,जिल्हा प्रतिनिधी कॉंग्रेस अतुल जगदाळे,तालुका अध्यक्ष युवक कॉंग्रेस श्रेयस मुनोत,अध्यक्ष दौंड शहर अल्पसंख्यक कॉंग्रेस रज्जाक भाई शेख आणि उपाध्यक्ष अल्पसंख्यक कॉंग्रेस सुरेश क्षिरसागर यांनी सह्या केलेल्या आहेत.

Previous articleमहाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या आमरण उपोषणाला यश
Next articleभव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न