Home Blog Page 89

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे फराळ वाटप

उरुळी कांचन

द्वितीय श्रावणी सोमवार निमित्ताने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ, भवानीशंकर सोशल फाउंडेशन, पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फराळ चिवडा वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितांमध्ये मराठा महासंघ क्रीडा विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजीदादा साळुंखे, पश्चिम महाराष्ट्र युवक मराठा महासंघ उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, पश्चिम महाराष्ट्र संघटक गोरखभाऊ कामठे, इंदापूर तालुका शेतकरी मराठा महासंघ अध्यक्ष सौदागर पाडुळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संयोजक आणि उपस्थिती पुणे जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर, दौंड तालुका व्यापार उद्योग आघाडी अध्यक्ष सुरज चोरगे, दौंड तालुका शेतकरी मराठा महासंघ अध्यक्ष विशाल राजवडे, दौंड तालुका विद्यार्थी उपाध्यक्ष अशोक दळवी, विद्यार्थी सचिव सुरज आखाडे, विद्यार्थी कार्याध्यक्ष निखिल दौंडकर, हवेली तालुका महिला कार्याध्यक्ष निवेदिता खेडेकर, हवेली तालुका शेतकरी मराठा महासंघ उपाध्यक्ष तुषार साठे, विष्णू खेडेकर, वर्षा सातपुते, नवनाथ बोंगाणे, दादासो चोरमले इत्यादी होते.

चिवडा वाटप सौजन्य – अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शाखा, विकास टेमगिरे सौदागर पाडुळे यांनी केले होते. याच संघाच्या वतीने पहिला श्रावणी सोमवारी भाविकांना तुळशी वाटप कार्यक्रम करण्यात आला होता. कार्यक्रमाचे हे ६ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक श्रावणी सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे असे यावेळी युवक जिल्हाध्यक्ष मयूर सोळसकर यांनी सांगितले.

देऊळगाव राजे येथे “हर घर तिरंगा” जनजागृती रॅलीचे आयोजन

दिनेश पवार,दौंड

देऊळगाव राजे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान निमित्त तिरंगा रॅली चे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.

या रॅलीत सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते,दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा हे अभियान राबविले जाणार आहे याची जनजागृती म्हणून देऊळगाव राजेत ही रॅली काढण्यात आली होती.


यावेळी पुणे जिल्हा परिषद चे माजी सदस्य वीरधवल जगदाळे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे,सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव हरिभाऊ ठोंबरे, सरपंच स्वाती गिरमकर, उपसरपंच नारायण गिरमकर, माजी सरपंच अमित गिरमकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख सर यांनी केले तर आभार ग्रामसेवक अमीर शेख यांनी मानले

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड च्या पिंपरी-चिंचवड स्टेशन ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर पदी संगीता तरडे यांची निवड

नारायणगाव (किरण वाजगे)

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड च्या पिंपरी-चिंचवड स्टेशन ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर पदी आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या प्रमुख सदस्या व आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांची निवड करण्यात आली असून त्यांना महामेट्रो चे पदाधिकारी विनोद कुमार आगरवाल (डायरेक्टर ऑपरेशन ऑण्ड मेंटेनन्स) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी महा मेट्रो चे डी.जी.एम मनोजकुमार डैनियल उपस्थित होते.

संगीता तरडे ह्या मागील तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील महिलांसाठी त्यांच्या महिला फोरम च्या माध्यमातून उल्लेखनीय काम करत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची महामेट्रो च्या पिंपरी-चिंचवड स्टेशन ब्रॅण्ड अँबेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती डायरेक्टर विनोद कुमार आगरवाल यांनी दिली.

महामेट्रो च्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर झालेल्या संगीता तरडे ह्या देशातील पहिल्या महिला असून पुणे मेट्रो चे काम सुरू झाल्या पासून पुणे मेट्रो ची ओळख आणि त्याचा प्रसार होण्यासाठी संगीता तरडे यांनी अनेक वेळा महामेट्रो च्या अनेक उपक्रमात सहभाग घेऊन हजारो महिलांचा सहभाग नोंदविला आहे. त्याची दखल घेऊन त्यांची अशाप्रकारे नियुक्ती करण्यात आली आहे.
ब्रॅड अँबेसिडरपदी महा मेट्रो ने माझी नियुक्ती केली त्या

 बद्दल मी मनापासून आभारी आहे. महामेट्रो चा प्रवास हा सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त असल्याने निश्चितच महामेट्रो पिंपरी-चिंचवड करांच्या पसंतीला उतरेल. पिंपरी-चिंचवडकरांनी इंधन बचत, वेळ बचत तसेच प्रदूषणमुक्त वातावरण राहण्यासाठी व आपले आरोग्य जपण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेट्रो चा वापर व्हावा यासाठी मी प्रयत्नशील असून माझ्या फोरम च्या असलेल्या साठ हजार महिला सभासद यादेखील मेट्रो चा वापर करतील असा मला विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया संगीता तरडे यांनी व्यक्त केली आहे.

हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ स्मारक येथे श्री विष्णू मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना

राजगुरुनगर – येथील हुतात्मा राजगुरू यांच्या जन्म स्थळ स्मारक राजगुरूवाडा येथे देवघरात श्री विष्णू मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्त लोकसहभागातून हा कार्यक्रम संपन्न झाला.चास कमान येथील अवधूत आश्रमाचे सद्गुरू स्वामी शिव दत्त महाराज यांच्या हस्ते मूर्ती स्थापना करण्यात आली.

हुतात्मा राजगुरू ,भगतसिंग, सुखदेव स्मृती स्थळ बसस्थानक राजगुरुनगर येथून मंगेश गुंडाळ यांच्या शिवछत्रपती पथकाच्या ढोल ताशांच्या गजरात तसेच संत ज्ञानेश्वर भजन मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.शहरातील नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सलग तीन दिवस राजगुरुनगर ब्राम्हण सभा यांच्या २१ ब्रम्हवृंद यांनी संपूर्ण धार्मिक विधी ,साहित्य विनामूल्य केले. अन्न प्रसाद लोक राजगुरुनगर व्यापारी संघ तसेच हुतात्मा राजगुरू स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख यांच्या वतीने देण्यात आला.कृषी सहाय्यक पंकज नाईकरे यांनी मूर्ती दान केले.

पूर्वी महाराष्ट्र शासन पुरातत्व विभागाच्या वतीने हुतात्मा राजगुरू जन्म खोली ,देवघर ,भिंत आदी काम झाले असून देवघरात पारंपरिक श्री विष्णू मूर्ती नसल्याने नव्याने मूर्ती स्थापना करण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती खेड तालुका तसेच हुतात्मा राजगुरू स्मारक समिती,ब्राम्हण सभा यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गुरुकुल संगीत विद्यालय श्री नंदकुमार कोरे सर व विद्यार्थी यांच्या भजनाने कार्यक्रम सांगता झाली.

या कार्यक्रमासाठी पुरातत्व विभाग पुणे , हुतात्मा राजगुरू परिवार ,ब्राम्हण सभा अध्यक्ष नीलेश जोशी, कैवल्य वाघोलिकर,वसंत खेडकर ,गणेश खेडकर ,श्रीराम खेडकर ,निलेश गोडबोले,दीप्ती कुलकर्णी ,मंदार खाडे, संदिश शिंदेकर व सर्व ब्राम्हण वृंद यांचे सहकार्य लाभले.

हुतात्मा राजगुरू स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख ,शैलेश रावळ,सुशील मांजरे,बाळासाहेब कहाने,प्रवीण गायकवाड ,,भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती समन्वयक मधुकर गिलबिले गुरुजी,अमर टाटीया, अँड निलेश आंधळे ,किशोर कुमठेकर कैलास दुधाlळे , अड मनिषताई पवळे ,बाळासाहेब सांडभोर ,आनंद गावडे ,सुभाष रणपिसे महाराज आदींचे सहकार्य लाभले.

यावेळी राजगुरुनगर नगर परिषद मुख्य अधिकारी निवेदिता घार्गे, भारतीय जनता पक्ष जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,राजगुरुनगर बँक संचालक विजया ताई शिंदे किरण मांजरे, सागर पाटोळे, राहुल तांबे,राजेंद्र सांडभोर,किरण आहेर,राजेंद्र वाळुंज तसेच ,सुरेखा ताई श्रोत्रीय उपस्थित होते.

सरासरी पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी बी.जे.एस मध्ये कार्यशाळा संपन्न

गणेश‌,सातव वाघोली

भारतीय जैन संघटना वाघोली आणि रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली आणि पिंपरी विद्यालयातील शिक्षकांसाठी विशेष विद्यार्थ्यांच्या अध्यापनात शिक्षकांना येणाऱ्या समस्या,उपाय आणि शिक्षकांची भूमिका यावर एक दिवशीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष विद्यार्थ्यांना तसेच अध्यापनात गती नसणाऱ्या मुलांना विशिष्ट व सोप्या पद्धतीने त्यांच्या बुद्ध्यांकाप्रमाणे शिकवण्याची अतिशय गरज असते,त्याशिवाय ते विद्यार्थी इतर मुलांच्या मुख्य प्रवाहात येत नाहीत.

शिक्षणतज्ञ,रोटरी क्लबच्या प्रा.सौ.उर्मिला हळदणकर यांनी अध्यापनात गती नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोणत्या शिक्षण पद्धतीचा वापर करायचा, स्मार्टफोनची मदत कशी घ्यायची तसेच दृकश्राव्य साधने, शिकवलेल्या धड्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग,बोर्ड गेम्स वापर करून अगदी सोप्या पद्धतीने अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने देता येतील याचे मार्गदर्शन केले.

तसेच बाल मानसोपचार
तज्ञ रूता दातयांनी या मुलांमध्ये अध्ययन कौशल्य विकसित होण्यासाठी शिक्षकांविषयी तसेच इतर सहकारी विद्यार्थ्यांविषयी विश्वास, आपुलकी निर्माण होणे आवश्यक आहे आणि हे गप्पागोष्टी व साध्या साध्या वर्ग कृतींमधून साध्य होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला. ही कार्यशाळा आयोजनासाठी रोटरीचे प्रा.उज्वल तावडे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयातील शिक्षक श्री. राजेंद्र जायभाय यांनी केले.

सदर कार्यशाळेसाठी बीजेएसच्या वाघोली विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, पिंपरी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप देशमुख,तसेच दोन्ही विद्यालयातील शिक्षक बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा घेण्यासाठी रोटरी क्लब पुणे कोथरूडचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ लेले, सेक्रेटरी निना पांगारकर, डायरेक्टर राजेश भाटे यांनी विशेष मदत केली.

माहिती सेवा समितीच्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्याची प्रेरणा इतर गावांनी घ्यावी – वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस

गणेश सातव,वाघोली

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवासोबत मातोश्री श्रीमती कमल गोविंद वारघडे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वनविभाग पुणे,माहिती सेवा समिती,दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बकोरी देवराई वनराई प्रकल्पात देशी पर्यावरण पूरक स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी,हवेली वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांनी आपल्या मनोगतात बकोरी देवराई वनराई प्रकल्पाच्या कार्याची प्रेरणा घेऊन तालुक्यातील इतरही गावांनी आप-आपल्या गावात वृक्षारोपण करावे व आपला परिसर हरित करावा असे आवाहन यावेळी केले.

माहिती सेवा समिती व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गेले ५ वर्षापासुन परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहे.आज अखेर ३० हजार झाडांचे यशस्वी वृक्षारोपण व संवर्धन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने
वृक्षारोपण प्रसंगी वड,पिंपळ,रुद्राक्ष,बेहडा,हिरडा,कदंब,बुच,करंज, जांभुळ,बेल, अर्जुन,चिंच,पुत्रंजीवा,सिसम,बकुळ, कडुलिंब,भोकर अशा ११०० देशी प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वन व महसूल विभागाचे अधिकारी,उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, वृक्ष प्रेमी,माहिती सेवा समितीचे पदाधिकारी वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थीत होते.

उपस्थितीमध्ये हवेलीचे महसुल नायब तहसीलदार संजय भोसले,वनपरीमंडल अधिकारी मंगेश सपकाळे,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी नवनाथ वाळके,रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे योगेश बर्डे,वनरक्षक बी.एस. वायकर,गायकवाड, कांबळे,जगताप मॅडम, सातारकर मॅडम,बाजारे, जाधव त्याचप्रमाणे बकोरी गावचे उद्योजक सत्यवान गायकवाड, माहिती सेवा समिती हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहीरट,समितीच्या महीला अध्यक्ष मोहीनी तांबे,बकोरी गावचे माजी सरपंच संतोष वारघडे, संतोष सदाशिव वारघडे, वैकफील्ड कंफनीचे दादा मगर,राजेश वारघडे,गणेश जाधव, किरण जाधवराव,रवि सलगीरे,प्रकाश नागरवाड,उद्योजक बाळासाहेब हरगूडे,अजय कोलते , रघुनाथ गाडे,भावडीचे माजी सरपंच राहुल तांबे,उद्योजक गणेश गोगावले,हिंगणगाव सरपंच अंकुश कोतवाल,राजन कुटे, विशाल बहीरट,सुर्यकांत जाधव, शिवाजी गोते, संदिप कोलते,प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र सातव , पोलिस हवालदार वाघ साहेब,मोकाटे साहेब, सतीश जगताप, सुरेश जगताप,धनराज वारघडे त्याचप्रमाणे स्टार महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीचे संचालक अशोक घावटे, संपादक राजेंद्र शिंदे,पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर यांचेसह असंख्य महीला व तरुण कार्यकर्ते उपस्थीत होते.

सर्वांचे स्वागत माहिती सेवा समितीचे अध्यक्ष व बकोरी देवराई वनराई प्रकल्पाचे सर्वेसर्वा चंद्रकांत वारघडे यांनी केले.यापुढे बकोरी वनराईत ५ लक्ष झाडे लावण्याचा संकल्प आहे.यासाठी उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन वारघडे यांनी केले.

उरुळी कांचन येथे बालरंगभूमी नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

उरुळी कांचन –

बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धा शनिवारी उरुळीकांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन व प्रमुख पाहुणे परिक्षक नाट्य कालाकार संजय गोसावी, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे नऊ महिने नऊ दिवस चित्रपट ‘ बायको कमाल मेहूणी धमाल या विनोदी नाटकात तसेच ज्ञानेश्वर माऊली सोनी मराठी वर सुरु असलेल्या सिरियल मध्ये रखुमाईची भूमिका करणारी सिने अभिनेत्री गौतमी देवस्थळ, क्राईम पेट्रोल व बायको कमाल मेहुणीधमाल मधील सिनेअभिनेते वैभव लामतुरे तसेच सिने कालाकार महेश टिळेकर यांनी केले.

या प्रसंगी विधालयाचे प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य किसन कोकाटे, स्पर्धा नियोजक संगिता शिर्के व मोठ्या संख्येने स्पर्धक आणि पालक शिक्षक ही उपस्थित होते.

यावेळी सिने व नाट्य कालाकार संजय गोसावीं नी मुलांना अभिनयासाठी मार्गदर्शन केले. यास्पर्धेत उरुळी कांचन पंचक्रोशीतील १२ शाळांमधून ९९ स्पर्धकांनी भाग घेतला .

यामध्ये प्राथमिक फेरीत –
गट १ – ( १ ली ते २री ) – प्रथम कमांक – श्री जा प्रसाद देशपांडे, द्वितीय कमांक – श्रीरत्न ओंकार माने.
गट २ – ( ३ री ते ४ थी ) – प्रथम कमांक – आर्या अतुल आव्हाड, द्वितीय क्रमांक – प्रथमा परेश मांडके.
गट ३ – ( ५ वी ते ६ वी )- प्रथम क्रमांक – कु तेजस्विनी अशोक कांबळे, दितीय क्रमांक – वसुधा सुनिल मोराळे.
गट ४ – ( ७ वी ९ वी ) आरशिया सहाबिर शेख, सृष्टी सुरेंद्र गायकवाड, संस्कृती अमोल बारोटे, श्रेयस विठ्ठल म्हस्के, प्रांजल प्रकाश ढवळे यांनी उत्कृष्ठ अभिनय करून पुण्यात होणाऱ्या अंतिम फेरीतील नाट्यछटा स्पर्धेत प्रवेश मिळविला. सर्व सहभागी स्पर्धकांना सिनेकलाकारांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे संयोजन स्पर्धा केंद्र प्रमुख म्हणून संगिता शिर्के यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वंदना कोकाटे, मान्यवरांचा सत्कार उपप्रमुख किसन कोकाटे नी केले आभार विक्रांत पंडित सरांनी मानले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सर्वोदय संघाचे संचालक विश्वस्तांनी केले.

नाटयछटा स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य भारत भोसले यांच्या मार्गदर्शाखाली अध्यापक अध्यापिका यांनी प्रयत्न केले.

मावळ तालुक्यातील कामगारांचा मेळावा तळेगाव येथील मायमर मेडिकल कॉलेजच्या सभागृहात वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपन्न

कुरकुंभ, सुरेश बागल

भारतीय मजदूर संघ (ता. मावळ) तळेगाव येथील मायमर मेडिकल काॅलेज च्या सभागृहात वर्धापन दिनाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील कामगारांचा मेळावा संपन्न झाला.

या वेळी तालुक्यातील हॉस्पिटल, ईंजिनीयरींग ऊद्योग, शैक्षणिक संस्था, टोल नाका Express highway, फौड्री ऊद्योग, संरक्षण ऊद्योगातीलं कायम कंत्राटी कामगार, अॅटोमोबाईल ऊद्योग, नगर पालिका ई ऊद्योगातील कायम व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी प्रमुख वक्ते म्हणून भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सेक्रेटरी व ऊद्योग प्रभारी श्री रामनाथ गणेशे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री जालिंदर कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, श्री विद्याधर वडुलेकर संघटन मंत्री मुंबई , श्री ऊमेश विस्वाद अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे कार्याध्यक्ष , सचिन मेंगाळे अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस , पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अभय वर्तक, पुणे जिल्हा कार्यालय मंत्री श्री विवेक ठकार, श्री. अशोक थोरात ,श्रीमती बेबीराणी डे अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे कोषाध्यक्ष उपस्थित होते.या मेळाव्यास मध्ये २००ते २५० महिला, पुरूष कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

नागरीकांचे होणारे नुकसान व समस्या त्वरित लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन

उरुळी कांचन

उरुळी कांचनमध्ये प्रशासनाच्या नियोजन आणि पावसाच्या पुर्वीच्या दुरुस्तीच्या आभावामुळे नागरिक बेहाल स्थानिक किंवा शासकीय प्रशासनाकडून गावामध्ये पावसाळ्यापूर्वी खबरदारी म्हणून जी दुरुस्ती कामे केली जायला पाहिजे होती ती सर्वत्र न झाल्यामुळे तसेच जी विकासकामे केली आहेत. त्यामध्येही अनेक ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाल्यामुळे व ब-याचश्या त्रुटी राहिल्यामुळे आणि नागरिकरणाच्या वस्ती मध्ये अद्यापही अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे सर्व सामान्य उरुळी कांचनकरांना थोडा जरी पाऊस झाला तरी विविध समस्यांना आणि नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा कौटुंबिक सामाजिक अर्थिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. तरी संपूर्ण उरुळी कांचन मधील नागरीकांचे होणारे नुकसान व समस्या त्वरित लक्षात घेऊन आपण योग्य ती कार्यवाही करावी.

अन्यथा भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहराच्या वतीने सर्व सामान्य नागरिकांना मुलभूत सुविधा आणि सामाजाभिमुक विकासकामे करण्यासाठीची आंदोलने करण्यात येईल असे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष अमित कांचन यांनी ग्रामपंचायत उरुळी कांचन ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी शहराध्यक्ष अमित कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, अजिंक्य कांचन, अलंकार कांचन, आबासाहेब चव्हाण, शुभम वलटे, पूजा सणस, आशुतोष तुपे, गणेश घाडगे, अमित तुपे, आकाश दौंडकर, अक्षय कांचन, शरद खेडेकर, अक्षय रोडे, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

यवत येथे कानाखाली चापट मारली म्हणून केला धारदार शस्त्राने खून

योगेश राऊत ,पाटस

यवत ग्रामपंचायत हद्दीतील बाजारतळ परिसरात सोलापूर येथील व्यक्तीचा झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. मयताने दारू पियुन शिवीगाळ केली व कानाखाली चापट मारली म्हणून त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

राजबहादुर बालुसिंग ठाकुर उर्फ राजु सारखी (वय-४७ रा. यवत ता. दौंड, जि. पुणे मुळ रा.पहाडीपुर नेपाळ) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर संजय सखाराम बनकर (रा. तांबेवाडी खामगाव ता. दौंड जि. पुणे मुळ रा. मुरारजी पेठ, निराळे वस्ती महादेव मंदीराजवळ चिंचनगर, सोलापुर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत ग्रामपंचायत हद्दीतील पालखीस्थळ परिसरात बुधवारी (२७ जुलै) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा खून झाला होता. सदर खुनाचा यवत पोलीस शोध घेत असताना कोणताही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे खुनाचे गूढ उलगडणे हे पोलिसांसमोर मोठे ध्येय होते. त्यानुसार अज्ञात आरोपीचा शोध घेणे करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन यांनी चार टिम तयार केल्या होत्या.

पोलीस निरीक्षक नारायण पवार व डी. बी. पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. तसेच आरोपी हा नेपाळ देशातील रहिवासी आहे व तो नेपाळला जाणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री दौड रेल्वे स्टेशन येथुन खुनाच्या गुन्हयातील आरोपी राजबहादुर सारखी यास नेपाळला पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, त्याचायाकडे चौकशी केली असता मयताने दारू पियुन शिवीगाळ केली व कानाखाली चापट मारली म्हणून त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. न्यायालयाने आरोपीला गुरुवार (ता. ११) पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास नारायण पवार पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन हे करीत आहे.

सदरची कामगिरी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, मारुती बाराते तसेच स्थानिक गुन्हे शाखे कडील पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, अजय घुले यांचे पथकाने केली आहे.