मावळ तालुक्यातील कामगारांचा मेळावा तळेगाव येथील मायमर मेडिकल कॉलेजच्या सभागृहात वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपन्न

कुरकुंभ, सुरेश बागल

भारतीय मजदूर संघ (ता. मावळ) तळेगाव येथील मायमर मेडिकल काॅलेज च्या सभागृहात वर्धापन दिनाच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील कामगारांचा मेळावा संपन्न झाला.

या वेळी तालुक्यातील हॉस्पिटल, ईंजिनीयरींग ऊद्योग, शैक्षणिक संस्था, टोल नाका Express highway, फौड्री ऊद्योग, संरक्षण ऊद्योगातीलं कायम कंत्राटी कामगार, अॅटोमोबाईल ऊद्योग, नगर पालिका ई ऊद्योगातील कायम व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी प्रमुख वक्ते म्हणून भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय सेक्रेटरी व ऊद्योग प्रभारी श्री रामनाथ गणेशे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री जालिंदर कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, श्री विद्याधर वडुलेकर संघटन मंत्री मुंबई , श्री ऊमेश विस्वाद अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे कार्याध्यक्ष , सचिन मेंगाळे अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस , पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अभय वर्तक, पुणे जिल्हा कार्यालय मंत्री श्री विवेक ठकार, श्री. अशोक थोरात ,श्रीमती बेबीराणी डे अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे कोषाध्यक्ष उपस्थित होते.या मेळाव्यास मध्ये २००ते २५० महिला, पुरूष कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous articleनागरीकांचे होणारे नुकसान व समस्या त्वरित लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन
Next articleउरुळी कांचन येथे बालरंगभूमी नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न