नागरीकांचे होणारे नुकसान व समस्या त्वरित लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन

उरुळी कांचन

उरुळी कांचनमध्ये प्रशासनाच्या नियोजन आणि पावसाच्या पुर्वीच्या दुरुस्तीच्या आभावामुळे नागरिक बेहाल स्थानिक किंवा शासकीय प्रशासनाकडून गावामध्ये पावसाळ्यापूर्वी खबरदारी म्हणून जी दुरुस्ती कामे केली जायला पाहिजे होती ती सर्वत्र न झाल्यामुळे तसेच जी विकासकामे केली आहेत. त्यामध्येही अनेक ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाल्यामुळे व ब-याचश्या त्रुटी राहिल्यामुळे आणि नागरिकरणाच्या वस्ती मध्ये अद्यापही अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे सर्व सामान्य उरुळी कांचनकरांना थोडा जरी पाऊस झाला तरी विविध समस्यांना आणि नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा कौटुंबिक सामाजिक अर्थिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. तरी संपूर्ण उरुळी कांचन मधील नागरीकांचे होणारे नुकसान व समस्या त्वरित लक्षात घेऊन आपण योग्य ती कार्यवाही करावी.

अन्यथा भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन शहराच्या वतीने सर्व सामान्य नागरिकांना मुलभूत सुविधा आणि सामाजाभिमुक विकासकामे करण्यासाठीची आंदोलने करण्यात येईल असे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष अमित कांचन यांनी ग्रामपंचायत उरुळी कांचन ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी शहराध्यक्ष अमित कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, अजिंक्य कांचन, अलंकार कांचन, आबासाहेब चव्हाण, शुभम वलटे, पूजा सणस, आशुतोष तुपे, गणेश घाडगे, अमित तुपे, आकाश दौंडकर, अक्षय कांचन, शरद खेडेकर, अक्षय रोडे, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleयवत येथे कानाखाली चापट मारली म्हणून केला धारदार शस्त्राने खून
Next articleमावळ तालुक्यातील कामगारांचा मेळावा तळेगाव येथील मायमर मेडिकल कॉलेजच्या सभागृहात वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपन्न