माहिती सेवा समितीच्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्याची प्रेरणा इतर गावांनी घ्यावी – वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस

गणेश सातव,वाघोली

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवासोबत मातोश्री श्रीमती कमल गोविंद वारघडे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वनविभाग पुणे,माहिती सेवा समिती,दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बकोरी देवराई वनराई प्रकल्पात देशी पर्यावरण पूरक स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी,हवेली वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांनी आपल्या मनोगतात बकोरी देवराई वनराई प्रकल्पाच्या कार्याची प्रेरणा घेऊन तालुक्यातील इतरही गावांनी आप-आपल्या गावात वृक्षारोपण करावे व आपला परिसर हरित करावा असे आवाहन यावेळी केले.

माहिती सेवा समिती व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गेले ५ वर्षापासुन परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहे.आज अखेर ३० हजार झाडांचे यशस्वी वृक्षारोपण व संवर्धन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने
वृक्षारोपण प्रसंगी वड,पिंपळ,रुद्राक्ष,बेहडा,हिरडा,कदंब,बुच,करंज, जांभुळ,बेल, अर्जुन,चिंच,पुत्रंजीवा,सिसम,बकुळ, कडुलिंब,भोकर अशा ११०० देशी प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वन व महसूल विभागाचे अधिकारी,उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, वृक्ष प्रेमी,माहिती सेवा समितीचे पदाधिकारी वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थीत होते.

उपस्थितीमध्ये हवेलीचे महसुल नायब तहसीलदार संजय भोसले,वनपरीमंडल अधिकारी मंगेश सपकाळे,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी नवनाथ वाळके,रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे योगेश बर्डे,वनरक्षक बी.एस. वायकर,गायकवाड, कांबळे,जगताप मॅडम, सातारकर मॅडम,बाजारे, जाधव त्याचप्रमाणे बकोरी गावचे उद्योजक सत्यवान गायकवाड, माहिती सेवा समिती हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहीरट,समितीच्या महीला अध्यक्ष मोहीनी तांबे,बकोरी गावचे माजी सरपंच संतोष वारघडे, संतोष सदाशिव वारघडे, वैकफील्ड कंफनीचे दादा मगर,राजेश वारघडे,गणेश जाधव, किरण जाधवराव,रवि सलगीरे,प्रकाश नागरवाड,उद्योजक बाळासाहेब हरगूडे,अजय कोलते , रघुनाथ गाडे,भावडीचे माजी सरपंच राहुल तांबे,उद्योजक गणेश गोगावले,हिंगणगाव सरपंच अंकुश कोतवाल,राजन कुटे, विशाल बहीरट,सुर्यकांत जाधव, शिवाजी गोते, संदिप कोलते,प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र सातव , पोलिस हवालदार वाघ साहेब,मोकाटे साहेब, सतीश जगताप, सुरेश जगताप,धनराज वारघडे त्याचप्रमाणे स्टार महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीचे संचालक अशोक घावटे, संपादक राजेंद्र शिंदे,पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर यांचेसह असंख्य महीला व तरुण कार्यकर्ते उपस्थीत होते.

सर्वांचे स्वागत माहिती सेवा समितीचे अध्यक्ष व बकोरी देवराई वनराई प्रकल्पाचे सर्वेसर्वा चंद्रकांत वारघडे यांनी केले.यापुढे बकोरी वनराईत ५ लक्ष झाडे लावण्याचा संकल्प आहे.यासाठी उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन वारघडे यांनी केले.

Previous articleउरुळी कांचन येथे बालरंगभूमी नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न
Next articleसरासरी पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी बी.जे.एस मध्ये कार्यशाळा संपन्न