जयहिंद इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दिल्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी राख्या

नारायणगांव ,किरण वाजगे

कुरण (ता. जुन्नर) येथील जयहिंद इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या धामनखेल येथील नंदनवन या दिव्यांग मुलांच्या आश्रमाला भेट देण्यात आल्या.

शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या राखी बनवा या उपक्रमांतर्गत ३५० राख्या तयार करण्यात आल्या होत्या. या उपक्रमातून दिव्यांग विद्यार्थी व सामान्य विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा बंध निर्माण होतो. तसेच शाळेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनांचा विकास होतो म्हणून असे सहशालेय उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे मत जयहिंद इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य डॉ. किरण पैठणकर यांनी व्यक्त केले.

या उपक्रमासाठी सुप्रिया पांडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाकरीता संचालिका अंजली गुंजाळ, इंदूमती गुंजाळ, डॉ. शुभांगी गुंजाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन
Next articleनर्मदे हर ग्रुपच्या वतीने घोडेगाव पोलीस स्टेशनला सूचना फलकांचे वितरण