दौंड – सहजपूर फाटा ते राहू रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा नाहीतर आंदोलन करणार- सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे

कुरकुंभ ,सुरेश बागल

दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा ते फिल्टगार्ड कंपनी तसेच कंपनी – दहीटणे – राहू पर्यंतच्या रस्त्यावर भरपूर प्रमाणात मोठे मोठे खड्डे-साईडपटया उखडल्या आहेत. तरीही १०-१५ दिवसांच्या फरकाने वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे दौंडचे अभियंता माळशिखरे -यवतचे शिंदे सांगूनही अधिकारी आज – उद्या खड्डे बुजविण्याचे फक्त आश्वासन देतात. तसेच ज्या ठेकेदाराने सहजपूरफाटा ते पाटेठान पर्यंतच्या रस्त्यांचे काम ३-४ वर्षांपूर्वी ५ कोटींना घेतलें होते.

तसेच रस्त्यांच्या डागडुजीची ५ वर्ष ठेकेदारांची जबाबदारी असतानाही दुर्लक्ष केले जात आहे .तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने लक्ष घालून सहजपूर फाटा ते पाटेठान-राहू पर्यंतच्या रस्त्यावरील गुडघाभर मोठे- मोठे खड्डे पडले आहेत. तरीही सहजपूर फाटा ते फिल्टगार्ड कंपनीपर्यंत मोठमोठे खड्डे असल्याने दिवसा – रात्रीच्या वेळी टु व्हीलर गाड्यांवर प्रवास करणाऱ्या शेतकरी, कामगार आणि वाटसरू लोकांना खड्डे असल्याने मोठ्या गाड्यामुळे लहान गाड्यांचा रोजच अपघात घडत आहेत त्यामुळे काही शेतकरी -कामगाराचा अपघातात जीव गेलेला आहे काही लोकांना अपंगत्व आले आहे, तरीही लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत तसेच आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत ज्या ज्या लोकांना या रस्त्यावर जीव गमवावा लागला आहे त्यांना यवतच्या शिंदे साहेबांनी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच मागणी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले तर दौंड – यवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आॅफिससमोर सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे आंदोलन करणार आहे.

Previous articleघोडेगाव पोलिस स्टेशनचे दबंग अधिकारी api जीवन माने यांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना ‘Big Salute Award’ प्राप्त
Next articleऊर्जामंत्री यांच्या नियुक्ती मूळे कंत्राटी कामगारांमध्ये ऊर्जा