ऊर्जामंत्री यांच्या नियुक्ती मूळे कंत्राटी कामगारांमध्ये ऊर्जा

कुरकुंभ, सुरेश बागल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे राज्याचे ऊर्जा खाते आल्यामुळे राज्यातील वीज कंत्राटी कामगारांमध्ये नवीन ऊर्जा आली आहे. या बद्दल महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) अभिनंदन केले आहे.

नवीन ऊर्जामंत्री हे सकारात्मक व ऊर्जावान असून राज्यातील शोषित वीज कंत्राटी कामगारांना ते नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने व्यक्त केली आहे.

लवकरच नवीन ऊर्जामंत्री यांची भेट घेऊन राज्यातील त्रस्त वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ प्रयत्न करेल अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleदौंड – सहजपूर फाटा ते राहू रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा नाहीतर आंदोलन करणार- सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे
Next articleसंपूर्ण नारायणगाव वारूळवाडी झाले तिरंगामय