संपूर्ण नारायणगाव वारूळवाडी झाले तिरंगामय

नारायणगाव (किरण वाजगे)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत नारायणगाव (ता. जुन्नर) येथे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. यामुळे संपूर्ण नारायणगाव शहर तिरंगामय झाले.
नारायणगाव ग्रामपंचायत च्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. गावामध्ये काही ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, पूर्ववेस, पश्चिम वेस तसेच शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते बस स्टॅन्ड नारायणगाव पर्यंत रस्त्यावर आकर्षक तिरंगी रंगाच्या सजावटी मुळे गावामध्ये एक प्रकारे अनोखी देशभक्तीची ऊर्जा निर्माण झाली आहे. अशी भावना सरपंच योगेश पाटे यांनी व्यक्त केली.
वारूळवाडी ग्रामपंचायत च्या वतीने देखील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. वारूळवाडी ग्रामपंचायतच्या मुख्य इमारतीवर भव्य दिव्य असा तिरंगा झेंडा लावण्यात आला असून ठिकठिकाणी आकर्षक तिरंगी सजावट करण्यात आली आहे. सरपंच राजेंद्र मेहेर व ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे.

Previous articleऊर्जामंत्री यांच्या नियुक्ती मूळे कंत्राटी कामगारांमध्ये ऊर्जा
Next article७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या वतीने भवरापूर येथे १५००० वृक्षांची लागवड