नर्मदे हर ग्रुपच्या वतीने घोडेगाव पोलीस स्टेशनला सूचना फलकांचे वितरण

घोडेगाव –  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी श्रावणी यात्रे निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. गेले दोन वर्षात कोरोनामुळे भाविकांचे दर्शन झाले नाही त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे गर्दी पहावयास मिळत आहे यातूनच प्रत्येकाला लवकर दर्शन व्हावे हीच अपेक्षा असते यातून अनेक वेळा पोलिस प्रशासना बरोबर भाविकांचे वाद होत असतात हे वाद टाळले जावे यासाठी घोडेगाव येथील नर्मदे हर ग्रुप परिवाराच्यावतीने पुढाकार घेऊन नियमांचे पालन करण्यासाठी असलेल्या सूचना फलकाचे वितरण यावेळी घोडेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आले त्यामुळे किमान प्रत्येक भाविकाला पोलिसांकडून वेगळी सूचना द्यावी लागणार नाही

यावेळी नर्मदे हर ग्रुपचे अध्यक्ष विनोद काळे सर, घोडेगाव पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने ,घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे ,कपिल काळे,अक्षय काळे,धनंजय काळंबे, नरेंद्र काळे,अंकुश काळे,पोलिस संपत कायगुडे तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते

Previous articleजयहिंद इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दिल्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी राख्या
Next article“संत निरंकारी मिशन द्वारे हरित विश्वाकडे एक अर्थपूर्ण पाऊल”