“संत निरंकारी मिशन द्वारे हरित विश्वाकडे एक अर्थपूर्ण पाऊल”

उरूळीकांचन, पुणे

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशन द्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ २१ ऑगस्ट, २०२१ रोजी करण्यात आला . तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण भारतातील अनेक राज्यांच्या विविध शहरांमध्ये दिवसेंदिवस या वृक्ष लागवडीच्या संख्येमध्ये वाढ होत आहे .

या परियोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील नानगाव ब्रँच मधील खुटबाव, लोणावळा ब्रँच मधील कामशेत, पाषाण (सुतारवाडी), कोरेगाव मुळ येथे १५००० पेक्षा अधिक वृक्ष लावण्यात आले आहेत. या वर्षी देखील मिशनच्या माध्यमातून १४ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या विविध शहरांमध्ये अनेक नव्या ठिकाणाचा समावेश होत आहे . यादिवशी पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन येथील भवरापूर या ठिकाणच्या वननेस -वन प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. वन विभागाकडून वृक्षारोपण करण्यासाठी या ठिकाणी ५७ एकर जमीन उपलब्ध झाली असून आजच्या दिवशी आठ एकरमध्ये १५००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील या कार्यामध्ये खूप सहयोग लाभत आहे.

संत निरंकारी मिशनचे श्री.ताराचंद करमचंदानी पुणे झोनचे क्षेत्रीय प्रभारी, सेवादलाचे क्षेत्रीय संचालक, संयोजक तसेच स्थानिक प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादलचे स्थानिक अधिकारी व स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम करुन वृक्षारोपणासाठी जमिनीचे सपाटीकरण करणे, खड्डे खोदणे तसेच पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे कार्य गेले आठ दिवस करत आहेत. संत निरंकारी मिशनचे सेवादार वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे त्यांची देखभाल करतील. त्यामध्ये वृक्षांचे रक्षण, खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादिंचा समावेश आहे.

हे सर्व विदित आहे की, संत निरंकारी मिशन हे एक विश्वस्तरीय आध्यात्मिक व्यासपीठ आहे जे सर्वांभूती निराकार ईश्वराची अनुभूती बाळगून प्रेम, सहिष्णुता व सद्भावपूर्ण एकत्वाच्या विचारधारेमध्ये विश्वास बाळगते. मिशनमार्फत पर्यावरण सुरक्षेसाठी सातत्याने कार्य करण्यात येत आहे. वेळोवेळी देशभर वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण, जल संरक्षण, घनकचरा प्रबंधन (Waste Management) आणि प्लास्टिकचा उपयोग न करणे यांसारख्या अभियानांमध्ये पुढाकार घेत आले आहे.

Previous articleनर्मदे हर ग्रुपच्या वतीने घोडेगाव पोलीस स्टेशनला सूचना फलकांचे वितरण
Next articleघोडेगाव पोलिस स्टेशनचे दबंग अधिकारी api जीवन माने यांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना ‘Big Salute Award’ प्राप्त