Home Blog Page 86

संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते गुरुवर्य सबनीस विद्यालयात ध्वजारोहण

नारायणगाव : (किरण वाजगे)

ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर येथे शाळेचे माजी विद्यार्थी, संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी,राज्य,राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांचा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सर्व संचालक, सर्व विभागांचे प्रमुख,विद्यार्थी,पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी छात्रसेना, स्काऊट,गाईड मधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक संचलन करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली. ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी देशभक्तीपर समूहगीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख भीमराव पालवे आणि बबन गुळवे यांनी केले.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे पोलीस बांधव, पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव

उरुळी कांचन

तृतीय श्रावण सोमवार निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ, भवानीशंकर सोशल फाउंडेशन, पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र भुलेश्वर येथे उपस्थित असलेले पोलीस बांधव, पत्रकार बंधु, स्वच्छता कर्मचारी यांच्या सोबत रक्षाबंधन साजरा करण्यात आला. सोबत उपस्थितांना चिक्की, सुगंधी दूध आणि राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. श्री क्षेत्र भुलेश्वर येथील पत्रकारांचा मराठा महासंघाच्या वतीने सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन गौरव देखील करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितांमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष रणजित दादा जगताप, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद भैया कोंडे, प्रदेश संघटक करणसिंह रणवीर, अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न बहुजन महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अर्चनाताई शहा- भिवरे पाटील, बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष बाळाभाऊ गालफाडे, प्रदेश उपाध्यक्ष आकाश कदम, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वांढेकर, युवक जिल्हाध्यक्ष मयूर आबा सोळसकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोतवाल, तुषार शेळके, बारामती तालुका महिला अध्यक्ष कल्पना काटकर, दौंड तालुका महिला अध्यक्ष मनिषा नवले, उज्वला ताडगे, शिरुर तालुका महिला अध्यक्ष सविता गवारे, हवेली तालुका महिला कार्याध्यक्ष निवेदिता खेडेकर, दौंड तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी रोहिणी दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन,उपस्थिती- दौंड तालुका युवक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, दौंड तालुका व्यापार-उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुरज चोरगे, दौंड तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष समीर लोहकरे, हवेली तालुका अध्यक्ष अतुल मोरे, तालुका उपाध्यक्ष सचिन गुंड, विद्यार्थी सचिव सूरज आखाडे, शेतकरी मराठा महासंघ अध्यक्ष विशाल राजवडे, शेतकरी आघाडी उपाध्यक्ष विकास टेमगिरे, युवक कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, दौंड तालुका बहुजन आघाडी उपाध्यक्ष रोहित कांबळे, श्री खेडेकर, हवेली तालुका उपाध्यक्ष तुषार आप्पा साठे, दौंड तालुका युवक संघटक प्रशांत ताडगे, बाळकृष्ण काकडे, विजय तुपे, सुरेश वाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम सौजन्य – जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर, दौंड तालुका युवक कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी दिले. यावेळी पत्रकार दैनिक पुढारी मुनीर शेख, दैनिक पुण्यनगरी प्रदीप कदम, दैनिक सामना बाळासाहेब मुळीक, अजय तोडकर, पत्रकार अमोल भोसले, कवि दशरथजी यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमांमध्ये दिवंगत आमदार मराठा महासंघाचे माजी सरचिटणीस व शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांना आदरांजली वाहण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम सूत्रसंचालन जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर यांनी केले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सोरतापवाडी ग्रामपंचायतचा आर आर पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्काराने गौरव

उरुळी कांचन

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, जिल्हा परिषदेचे सी ओ आयुष प्रसाद यांचे हस्ते ग्रामविकासासाठी, महिला सक्षमीकरणासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेल्या पूर्व हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गावाला पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत आर आर पाटील स्मार्ट व्हिलेज (सुंदर गाव) पुरस्कार २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सन्मानचिन्ह व दहा लक्ष रुपये असा पुरस्कार सोरतापवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच संध्याताई अमित चौधरी व ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण व संतोष गायकवाड तसेच संतोष नेवसे यांना प्रदान करण्यात आला.

सोरतापवाडी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, घनकचरा, सांडपाणी निर्मूलन, वृक्षारोपण, संवर्धन, करवसुली, सुविधा, कृषी या सर्व आघाड्यावर काम करुन पर्यावरण, सौदर्य, आरोग्य संतुलित गावाच्यादृष्टीने ठळक कामे केल्याने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, गटविकास अधिकारी अमर माने यांच्या मुल्यांकनात ग्रामपंयातीला स्मार्ट व्हिलेट म्हणून हवेली तालुक्यातून निवडण्यात आले आहे.

पद्मश्री मणीभाई देसाई महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी

उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलीत, पद्मश्री मणीभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन (ता.हवेली) येथे डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.समीर आबनावे होते.

अध्यक्षीय मनोगतून कला व मराठी विभाग प्रमुख डॉ.समीर आबनावे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले व विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासून ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करुन आत्मनिर्भर व्हावे व नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथालय विभागप्रमुख प्रा.सौरभ साबळे यांनी केले. त्यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला. आभारप्रदर्शन प्रा.शैलजा वाडेकर यांनी केले. यावेळी प्रा.अंजली शिंदे, प्रा. प्रदीप राजपूत, प्रा रोहित बारवकर, प्रा. तोरवे, प्रा.मोरेश्वर बगाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. प्रदीप राजपूत व विशाल महाडिक या सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

पाटसमध्ये १००१ फूट लांबीच्या राष्ट्रीय ध्वजाची भव्य रॅली

योगेश राऊत,पाटस
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाटस (ता .दौंड) येथे एक हजार एक फूट राष्ट्रध्वजाची भव्य रॅली काढण्यात आली . माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते तानाजी केकाण यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला .

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते . भारत माता की जय , वंदे मातरम या जयघोषाने परिसर दुमदुमला होता . आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी केकाण यांनी तब्बल १००१ फूट राष्ट्रध्वज स्वखर्चाने तयार करून या तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते .

रविवारी सकाळी ८ वाजता या रॅलीला सुरुवात झाली . राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर चौक ते ग्रामदैवत श्रीनागेश्वर मंदिरपर्यंत ही रॅली काढण्यात आली . गावातील चौकाचौकात या रॅलीचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले . या रॅलीने ग्रामदैवत श्रीनागेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालून श्रीनागेश्वर विद्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला .

तसेच पाटस गटातील जिल्हा प्राथमिक शाळा व हायस्कूल या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वजा फडकवणात आलाय
त्याचप्रमाणे शिंदे वस्ती अंगणवाडी पाटस मधील चिमुकल्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारे राष्ट्रध्वजा बद्दल खूप छान प्रकारे माहिती दिली .

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील मुलांना खाऊ वाटप व डब्बा पिशव्या ग्रामपंचायत सदस्य राजू शिंदे यांच्या स्वखर्चातून भेट देण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाला सरपंच अवंतिका शितोळे ग्रामपंचायत सदस्य पालक वर्ग सी डी पी ओ अक्षदा शिंदे मॅडम गटविकास अधिकारी रोकडे आणि शिक्षक वर्ग आशा सेविका यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडला.

संस्कार व शिस्त यामुळे विद्यार्थी सूक्ष्म होतो – महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त-खजिनदार राजाराम कांचन यांचे प्रतिपादन

उरुळी कांचन

अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना सुचविणे, अभ्यासाशी पूरक असलेल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यास सहाय्य मिळविणे, सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे. आपला मुलगा मुलगी शाळेत वेळेत जातो का अभ्यासाव्यतिरिक्त तो काय करतो सर्व लक्ष आपल्या मुलांच्यावर असणे पालकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थी गैरहजर राहिल्यास अभ्यासाची लिंक तुटते म्हणून आपला पाल्य जास्तीत जास्त शाळेत पाठवा घरचे वातावरण प्रसन्न ठेवा. संस्कार व शिस्त यामुळे विद्यार्थी सूक्ष्म होतो तसेच विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र तपासले पाहिजे असे मत महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त-खजिनदार राजाराम कांचन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरुन पालकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन (ता.हवेली) येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची पालक सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य किसन कोकाटे, इयत्ता ९ वी व १० वीच्या विभागप्रमुख सुशीला कुंजीर, चारुशीला हेडाऊ, किशोर येवलेकर, इयत्ता ९ वी चे सर्व वर्गशिक्षक व पालक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उरुळी कांचन शहर उपाध्यक्षपदी जयंत काकडे यांची निवड : जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

उरुळी कांचन

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते जयंत बाळकृष्ण काकडे यांची उरुळी कांचन (ता.हवेली) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्षपदाचे निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. उरुळी कांचन राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष रामदास तुपे यांनी निवड केली.

याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सागर कांचन, हवेली तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस अध्यक्षा सुरेखा भोरडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, माजी उपसरपंच सागर कांचन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे उपाध्यक्ष बाळकृष्ण काकडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस उपाध्यक्ष स्वराज्य तुपे, युवा नेते सुभाष टिळेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस आदेश तुपे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या वतीने भवरापूर येथे १५००० वृक्षांची लागवड

उरुळी कांचन

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ २१ ऑगस्ट, २०२१ रोजी करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण भारतातील अनेक राज्यांच्या ३७५ हुन अधिक शहरांमध्ये दिवसेंदिवस या वृक्ष लागवडीच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या परियोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यात मागील वर्षांपासून नानगाव ब्रँच मधील खुटबाव, लोणावळा ब्रँच मधील कामशेत, पाषाण(सुतारवाडी), कोरेगावमुळ येथे २१००० पेक्षा अधिक वृक्ष लावण्यात आले आहेत. या वर्षी देखील मिशनच्या माध्यमातून १४ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या विविध शहरांमध्ये अनेक नव्या ठिकाणाचा समावेश होत आहे.

यादिवशी पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील भवरापूर या ठिकाणी वननेस -वन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. वन विभागाकडून वृक्षारोपण करण्यासाठी या ठिकाणी ५७ एकर जमीन उपलब्ध करण्यात आली असून १४ ऑगस्ट २०२२, रविवार या दिवशी आठ एकरमध्ये १३४ प्रजातींच्या १५००० वृक्षांची लागवड करण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नदीपासून लागवड क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

या कार्यक्रमाला सरपंच सचिन सातव, पंचायत समितीचे मा.सदस्य सुभाष जगताप, प्रवक्ते विकास लवांडे, मा.प.स.सदस्य धनंजय साठे, सरपंच कविता जगताप, सरपंच राजेंद्र कांचन, सरपंच तानाजी चौधरी, वन परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, किरण धायगुडे, मा.जि.प.सदस्य महादेव कांचन, पु.जि.नि.स. सदस्य संतोष कांचन, प.स.सदस्या हेमलता बडेकर, शामराव गावडे, सारिका लोणारी, मा.सरपंच दत्तात्रय कांचन, अजिंक्य कांचन, विकास जगताप, बबनराव साठे, सुभाष साठे, आण्णा साठे, योगेश साठे, हनुमंत साठे, वन विभाग मंगेश सपकाळे, अशोक गायकवाड, अमित कांचन, ऋषीकेश शेळके, सुनिल तुपे, आबासाहेब चव्हाण, सुभाष बगाडे, सुचिस्मिता वनारसे, पुजा सणस उपस्थित होते.

संत निरंकारी मिशनचे ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी), सेवादलाचे क्षेत्रीय संचालक, संयोजक तसेच स्थानिक प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादलचे स्थानिक अधिकारी, संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन चे स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम करुन वृक्षारोपणासाठी जमिनीचे सपाटीकरण करणे, खड्डे खोदणे तसेच पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे कार्य गेले आठ दिवस करीत आहेत. संत निरंकारी मिशनचे सेवादार वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे त्यांची देखभाल करतील, त्यामध्ये वृक्षांचे रक्षण, खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादिंचा समावेश आहे.

हे सर्व विदित आहे की, संत निरंकारी मिशन हे एक विश्वस्तरीय आध्यात्मिक व्यासपीठ आहे जे सर्वांभूती निराकार ईश्वराची अनुभूती बाळगून प्रेम, सहिष्णुता व सद्भावपूर्ण एकत्वाच्या विचारधारे मध्ये विश्वास बाळगते. मिशनमार्फत पर्यावरण सुरक्षेसाठी सातत्याने कार्य करण्यात येत आहे, तसेच वेळोवेळी देशभर वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण, जल संरक्षण, घनकचरा प्रबंधन, रक्तदान शिबीर, स्वछता अभियान यांसारख्या अभियानांमध्ये पुढाकार घेत आले आहे.

संपूर्ण नारायणगाव वारूळवाडी झाले तिरंगामय

नारायणगाव (किरण वाजगे)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत नारायणगाव (ता. जुन्नर) येथे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले. यामुळे संपूर्ण नारायणगाव शहर तिरंगामय झाले.
नारायणगाव ग्रामपंचायत च्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. गावामध्ये काही ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, पूर्ववेस, पश्चिम वेस तसेच शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते बस स्टॅन्ड नारायणगाव पर्यंत रस्त्यावर आकर्षक तिरंगी रंगाच्या सजावटी मुळे गावामध्ये एक प्रकारे अनोखी देशभक्तीची ऊर्जा निर्माण झाली आहे. अशी भावना सरपंच योगेश पाटे यांनी व्यक्त केली.
वारूळवाडी ग्रामपंचायत च्या वतीने देखील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. वारूळवाडी ग्रामपंचायतच्या मुख्य इमारतीवर भव्य दिव्य असा तिरंगा झेंडा लावण्यात आला असून ठिकठिकाणी आकर्षक तिरंगी सजावट करण्यात आली आहे. सरपंच राजेंद्र मेहेर व ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे.

ऊर्जामंत्री यांच्या नियुक्ती मूळे कंत्राटी कामगारांमध्ये ऊर्जा

कुरकुंभ, सुरेश बागल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे राज्याचे ऊर्जा खाते आल्यामुळे राज्यातील वीज कंत्राटी कामगारांमध्ये नवीन ऊर्जा आली आहे. या बद्दल महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) अभिनंदन केले आहे.

नवीन ऊर्जामंत्री हे सकारात्मक व ऊर्जावान असून राज्यातील शोषित वीज कंत्राटी कामगारांना ते नक्कीच न्याय देतील अशी अपेक्षा भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने व्यक्त केली आहे.

लवकरच नवीन ऊर्जामंत्री यांची भेट घेऊन राज्यातील त्रस्त वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ प्रयत्न करेल अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.