देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात आदिवासींचे योगदान- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

उरुळी कांचन

९ ऑगस्ट ७५ व्या आमृत महोत्सवी आदिवासी दिन संपूर्ण देशात आनंदाने साजरा करण्यात आला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आदिवासींचे योगदान फार मोलाचे आहेत असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव व गुणगौरव कार्यक्रम आदिवासी विकास विभाग नागपूर येथील कार्यक्रमात भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या वेळी महाराष्ट्रामध्ये व देशात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व आदिवासी आयुक्त रविंद्र ठाकूर, यांच्या हस्ते आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांना सन्मानित करण्यात आले. सत्कार स्विकारताना नामदेव भोसले व शेवराई ज्ञानदेव भोसले,भास्कर भोसले, ॠतुजा भोसले, शोभा भोसले हे उपस्थित होते.

स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता “मराशी” या पुस्तकाद्वारे भारतातील आदिवासी पारधी भाषा लिखित स्वरूपात आणले व आदिवासींसाठी हिताचे उल्लेखनीय भरीवदार काम साहित्यिक नामदेव भोसले यांनी केले आहे, म्हणून नामदेव भोसले, भास्कर भोसले यांना सन्मानित करण्यात आले.

Previous articleझाडांना राख्या बांधून साजरे करण्यात आले वृक्ष रक्षाबंधन
Next articleशिंदेवाडी येथे तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण