शिंदेवाडी येथे तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

उरुळी कांचन

हवेली तालुक्यातील शिंदेवाडी येथील गायरानावर हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते लक्ष्मितरू वृक्षाचे वृक्षारोपण करुन वृक्ष लागवड करण्यात आले. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून शाश्वत विकास फाउंडेशन ग्रामपंचायत शिंदेवाडी ग्रामपंचायत हिंगणगाव कृषी विभाग महसूल विभाग यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी २५१ वृक्षांचे वृक्षारोपण केले.

रिमझिम पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या या पावसाचा आनंद घेत तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील व सर्व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करण्याचा आनंद घेतला. यावेळी महिलांनी वृक्षांना राखी बांधून वृक्षारोपण केले.

यावेळी वृक्षारोपण कार्यामध्ये अनमोल सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूजचे संचालक अशोक घावटे , उपसंपादक राजेंद्र शिंदे, ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप, मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद, शिंदेवाडीचे सरपंच संदीप जगताप, भवरापुरचे सरपंच सचिन सातव, सांगवीचे सरपंच नरसिंग लोले, हिंगणगावच्या सरपंच विद्या सागर थोरात, मंडल कृषी अधिकारी गणेश सुरवसे, कृषी अधिकारी नीलम कासारे, शिंदेवाडीच्या ग्रामसेविका मोनिका माझीरे, हिंगणगावच्या ग्रामसेविका सुवर्णा लोंढे, आर्ट ऑफ लिविंगचे साधक अजित रणसिंग, अष्टापुरचे तलाठी सुधीर जायभाय, कोरेगावमूळचे तलाठी प्रदीप जवळकर, सोरतापवाडीचे तलाठी निवृत्ती गवारी, शाश्वत विकास फाउंडेशनचे सदस्य रघुनाथ हरपळे, विजय थोरात, राहुल थोरात, जयमाला जगताप यांच्यासह शाश्वत फाउंडेशन अध्यक्ष प्रभाकर जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleदेशाला स्वातंत्र्य मिळवण्यात आदिवासींचे योगदान- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Next articleहर घर तिरंगा अभियानातंर्गत पोलिसांच्या धावण्याच्या स्पर्धेत अमीर शेख प्रथम