Home Blog Page 81

टिळेकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुभाष लोणकर यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन

टिळेकर वाडी गावच्या सरपंचपदी सुभाष लोणकर तर उपसरपंचपदी नंदा जगन्नाथ राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी तथा मंडलाधिकारी नुरजहा सय्यद यांनी घोषित केले. खामगाव टेक मधून विभक्त होऊन टिळेकरवाडीची प्रथमताच ग्रामपंचायत निवडणूक सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्याचप्रमाणे सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध करण्यात आली. उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे एपीआय किरण धायगुडे यावेळी उपस्थित होते. यावेळी म.गा.सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गावची निवडणूक बिनविरोध झाली.

यावेळी श्री दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर, मा.सरपंच निता विजय टिळेकर, आबासाहेब टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश टिळेकर, गोवर्धन टिळेकर, सुशील राऊत, सुषमा टिळेकर, कल्पना टिळेकर, वैशाली चौरे, सदाशिव टिळेकर, सुभाष टिळेकर, बाळासाहेब चौरे, ग्रामविकास अधिकारी स्वाती बोराटे उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजना राबविण्यात येणार ग्रामस्थांनी जो विश्वास दाखवला तो आम्ही सार्थ करुन दाखवणार ग्रामपंचायतच्या विविध विकास कामाच्या माध्यमातून असे सरपंच सुभाष लोणकर यांनी सांगितले.

सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गणेश फेस्टिवलेचे आयोजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

उरुळी कांचन

सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हल २०२२’ चा शुभारंभ बुधवारी (ता. ३१) ऑगस्टपासून होत आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या वतीने ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या काळात आयोजित “सोरतापवाडी गणेश फेस्टिवल २०२२” चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार निलेश राणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक प्रदीप कंद, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश भेगडे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा माजी सरपंच कार्यक्रमाचे संयोजक सुदर्शन चौधरी यांनी दिली.

या फेस्टिवलमध्ये बुधवारी (ता. ३१) श्रींची प्रतिष्ठापना संध्याकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ०१) सकाळी कार्यक्रमाचे उद्घाटन व संध्याकाळी खेळ रंगला वहिनींचा होम मिनिस्टर, शुक्रवारी (ता. ०२) संध्याकाळी ऑर्केस्ट्रा, शनिवारी (ता. ०३) प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिव व्याख्यान, रविवारी (ता. ०४) डान्स व मिमिक्री स्पर्धा, सोमावारी (ता. ०५) संतोष पवार प्रस्तुत नाटक सुंदरा मनात भरली. मंगळवारी (ता. ०६) प्रसिद्ध लावण्यांचा कार्यक्रम तुमच्यासाठी काय पण, बुधवारी (ता. ०७) हा जल्लोष महाराष्ट्राचा, गुरुवारी (ता. ०८) प्रसिद्ध कीर्तनकार हभप रामराव महाराज ढोक यांचे संपूर्ण कीर्तन, शुक्रवारी (ता. ०९) भव्य विसर्जन मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी पुर्व हवेली तालुक्यातील विविध गावचे सरपंच – उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन – व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, तरुण वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे अशी माहिती सुदर्शन युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुहास चौधरी यांनी दिली.

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील (सन १९९२-९३ )  १० वीचे  विद्यार्थी तब्बल २९ वर्षांनी पुन्हा आले  एकत्र

 

 

 

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात  माजी विद्यार्थ्यांचा “स्नेहमेळावा” पार पडला. यानिमित्त इयत्ता १० वी चे १९९२-९३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २९ वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे माजी शिक्षक व सध्या नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले  लठाड सर तसेच  वनवे सर (शिक्षणाधिकारी) प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमात माजी प्राचार्य अरविंद खिरे सर , किसनराव नेवसे सर , बबनराव दिवेकर सर, बाळकृष्ण काकडे सर, सय्यद सर, कांचन सर, सौ.बडगुजर मॅडम , विद्यमान प्राचार्य भारत भोसले सर, उपप्राचार्य किसन कोकाटे सर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल-श्रीफळ ,व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थीनी मिळून १७५ जण उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमेकांशी सुसंवाद साधून आठवणींना उजाळा दिला. आपापल्या वर्गात जाऊन वर्गशिक्षकांबरोबर संवाद साधला. याप्रसंगी प्रस्ताविक व स्वागत डॉ. शरद गोते यांनी केले. सूत्रसंचालन विकास म्हेत्रे तर आभार सदानंद बालगुडे यांनी मानले. यावेळी दिपक थोरात, भाऊसाहेब महाडिक, गणेश पवार ,संजय पोतदार ,सुवर्णा कांचन, हेमलता पवार ,यांनी मनोगत व्यक्त केले.

 

या स्नेहमेळाव्यासाठी कालिदास तुपे, संतोष शितोळे, अजय सोनवणे, नाना चौधरी, नितीन गोते, सूर्यकांत काकडे, चंद्रशेखर शितोळे, विजय तांबे, शेखर अलिपुर, सतीश टिळेकर, महादेव रेवडकर, गोविंद शिंदे, सुनील निकाळजे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमा नंतर सर्वांनी कोरेगाव (मूळ) येथील “नेचर नेस्ट “मध्ये स्नेहभोजन केले.

नारायणगाव मध्ये भरवस्तीतील ज्वेलर्सचे दुकान फोडले

किरण वाजगे

नारायणगाव (ता.जुन्नर) येथे भर वस्तीमध्ये असलेल्या दोन ज्वेलर्सची दुकाने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेतील तीन ते चार चोरटे एका मारुती कारमधून आले होते. ही घटना (दि. ३० ) ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौक, नारायणगाव येथे घडली. लोळगे सराफ या दुकानातून ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व सोन्याच्या दोन नथा व वीस मुरण्या असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.

याबाबतची फिर्याद मंदा प्रकाश लोळगे (वय ६३, राहणार नारायणगाव) यांनी नारायणगाव पोलिसात दिली. त्यानुसार अज्ञान चोरट्यांवर भारतीय दंड विधान कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

लोळगे सराफ या दुकानातील सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज अज्ञान चोरट्यांनी चोरून नेला. तर संजय ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान जागरूक नागरिक पिंटू दिवटे यांच्या सतर्कतेमुळे अज्ञात चोरट्यांना फोडता आले नाही. शटर उचकटण्याचा प्रयत्न करताना सायरन चा आवाज झाल्याने पिंटू दिवटे जागे झाले व त्यांनी आरडाओरडा करताच हे चोरटे पसार झाले.
संजय ज्वेलर्स च्या शेजारीच असलेल्या विक्रांत सहकारी पतसंस्थेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ही घटना बंदिस्त झाली आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार साबळे हे करत आहे.

आर्थिक संस्थेत राजकारण व हस्तक्षेप नको – आमदार अतुल बेनके

नारायणगाव (किरण वाजगे)

श्रीराम पतसंस्थेची स्थापना माजी आमदार वल्लभ बेनके यांनी केली असून आर्थिक संस्थेत राजकारण व हस्तक्षेप नको या त्यांच्या भूमिकेचे पालन होत असल्याने श्रीराम पतसंस्थेची चांगली प्रगती झाली आहे असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

श्रीराम नागरी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नारायणगाव येथे सोमवारी (दि.२९) रोजी रघुकुल सभागृह येथे संस्थेचे चेअरमन तानाजी डेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी आमदार अतुल बेनके बोलत होते. संस्थेला १ कोटी ७९ लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश व दिवाळी भेटवस्तू देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

कार्यक्रमात संस्थेच्या वतीने आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, माजी सैनिक, गुणवंत कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या आळेफाटा येथील शाखेला उत्कृष्ट शाखा म्हणून गौरविण्यात आले. व्यवस्थापक सतिश भार्गव यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे यांनी पतसंस्थेच्या २०२१-२२ आर्थिक वर्षात संस्थेला “अ”ऑडिट वर्ग, ९३८५ सभासद व १५५ कोटीच्या ठेवी असल्याचे सांगितले. अहवाल सालात २५ कोटीच्या ठेवीत तर नफ्यात ६५ लाखाची वाढ झाली आहे. संस्थेने १२० कोटी ३९ लाखांचे कर्ज वाटप केले असून १७९ कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. कोरोना संसर्गाच्या काळात पतसंस्थेने विविध समाज हिताचे उपक्रम राबवले आहे.
संस्थेचे संचालक व राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके यांनी संचालक मंडळ सभासदांच्या हिताचे निर्णय घेत आहे. आर्थिक शिस्त पाळून पतसंस्थेने गुणात्मक प्रगतीचा आलेख उंचावला असल्याचे म्हटले.

याप्रसंगी सुनील श्रीवत, संचालक राजश्री बेनके, अमित बेनके, शशिकांत वाजगे, अनिल थोरात, यल्लू लोखंडे, विजय घोगरे, अनिल डेरे, ज्ञानेश्वर रासने, नवनाथ चौगुले, अमीर तांबोळी, शीलाताई मांडे, सिताराम पाटे उपस्थित होते. ज्येष्ठ सभासद रत्नाकर सुबंध, नंदकुमार श्रीवत, अरुण औटी, दशरथ खेबडे, बाबुराव मुळे यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश नलावडे यांनी अहवाल वाचन केले तर उपाध्यक्ष सुनील श्रीवत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

६५ वर्षांच्या शिवकन्यांनी जिंकली शिवप्रेमींची मने !

राजगुरूनगर- तरुणाईला लाजवेल अशा कणखर बाण्यामध्ये शिवनेरी किल्ला एका दमात चढून शिवगीते, पोवाडा आपल्या सुरेल मर्दानी आवाजात गात ६५ वर्ष वयाच्या भगिनींनी शिवप्रेमींची मने जिंकली.

खेड तालुक्यातील वाकळवाडी गावच्या पवळे घराण्यातील माहेर आणि शेलपिंपळगाव मोहितेवाडीच्या पोतले परिवाराच्या सूना असलेल्या विमलबाई महादेव पोतले (वय ६५) आणि यमुनाआक्का ज्ञानेश्वर पोतले (वय ६०) या बहिणी पायी शिवनेरी किल्ल्यावर आल्या होत्या. शिवाई देवीचे दर्शन घेऊन संपुर्ण किल्ला पायी फिरुन पाहिला आणि शिवजन्मस्थळावर माथा टेकवून त्यांनी आपल्या सुरेल पहाडी आवाजामध्ये ‘बाल शिवाजीचा’ शिवजन्म पोवाडा गायला. त्याचबरोबर…
“शिवाजीराजे होऊन गेले
गाजवली तलवार।
आपण त्यांच्या वंशी जन्मलो
का पडलो थंडगार॥
स्वातंत्र्याचे निशान
आम्ही नाही सोडणार।
भारताचे निशाण
आम्ही नाही सोडणार॥
अशा गीतांनी सारे मंत्रमुग्ध झाले. मुळातच पवळे मंडळी हि मूळची शिवनेर पायथ्याजवळ बस्ती सावरगावची, जसे बाल शिवराय पुण्यात लाल महालाकडे राहायला निघाले तशी हि मंडळी पेठ, वाकळवाडी, रेटवडी, शिरोली, काळूस, पिरंगुट पर्यंत विसावत गेली. लालमहालाजवळ आजही पवळे चौक आहे, चाकणच्या लढाईत पवळे बंधूंच्या पराक्रमाची नोंद आहे. अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शिवकन्या शिवनेरीवर सगळ्या तरुणाईचे आकर्षणबिंदू ठरल्या, अनेकांनी त्यांच्या पोवाडा व गीतांचे व्हिडीओ काढले, सेलिब्रिटींसारखे त्यांच्यासोबत सेल्फी काढले.

“तरुण पिढीने गड किल्ल्यांना भेटी देऊन आपला ऐतिहासिक वारशाचा अभिमान जपावा आणि किल्ल्यांचे पावित्र्य राखावे” असे आवाहन या भगिनींनी केले.

यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे बंधू शिक्षकनेते धर्मराज पवळे, माऊली गोरडे, अक्षय गोरडे, राजवेद पवळे, कल्पना रेटवडे, विजया पवळे आदि शिवप्रेमी सोबत होते.

मनिषा मदने यांना आदर्श क्रीडा शिक्षिका तर आदर्श क्रीडा संघटक पुरस्कार धनंजय मदने यांना प्रदान

उरुळी कांचन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन (ता. २९) हा साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या वर्षी पवार पब्लिक स्कूल च्या क्रीडा शिक्षिका सौ. मनिषा धनंजय मदने यांना आदर्श क्रीडा शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर आदर्श क्रीडा संघटक पुरस्कार आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांना प्रदान करण्यात आला.

पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी मा.महादेव कसगावडे साहेब आणि मा.दादासाहेब देवकाते – उपजिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार मदने दाम्पत्यांना देण्यात आला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह ,भवानी पेठ पुणे येथे सोमवारी (ता. २९) पॅरा पडला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.

रोटरी क्लब नारायणगाव हायवेचा आदिवासी भागात अभ्यास दौरा

नारायणगाव : – (किरण वाजगे)

छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेली शिवजन्मभूमी जुन्नर येथे पर्यटनाला मोठा वाव आहे. राज्यातील एकमेव पर्यटनाचा दर्जा लाभलेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका होय.
दिवसेंदिवस येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच आहे. पर्यटन केल्याने ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक व अध्यात्मिक ज्ञानाबरोबरच मानसिक थकवा जाऊन निश्चित सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

याच अनुषंगाने रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटचे टोक असलेले आंबे हातवीज येथील कांचन धबधबा, कोकणकडा, दुर्गादेवी, तसेच घंटेचा दगड या पर्यटन स्थळाबरोबरच आंबोली येथील दाऱ्याघाट येथे रोटरीच्या पदाधिकाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांचा अभ्यास दौरा २८ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जुन्नरच्या आदिवासी भागातील असलेले ऐतिहासिक महत्त्व तेथे असलेली प्राणी संपदा, वनसंपदा, भौगोलिक परिस्थिती याविषयीची माहिती इतिहास तज्ञ प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड व रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष प्रा. डॉ श्रीकांत फुलसुंदर यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या फर्स्ट लेडी प्रा वैशाली फुलसुंदर, खजिनदार नारायण आरोटे, उपाध्यक्ष रवींद्र वाजगे, नारायणगाव विकास सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, प्रा. यादव, प्रा ओंकार मेहेर, नितीन भुजबळ, ओम पाटे तसेच रोटरियन व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

शरद पाबळे मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष : दोन सप्टेंबरला पुण्यात सत्कार

श्रावणी कामत ,लोणावळा

पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार शरद पाबळे हे मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष असतील.१ सप्टेंबर २०२२ रोजी ते आपल्या पदाची सूत्रे हाती घेत आहेत. शरद पाबळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती होत असल्याने शुक्रवार (दि.२) सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हाच पुढील अध्यक्ष असतो. त्यानुसार कार्याध्यक्ष राहिलेले शरद पाबळे आता अध्यक्ष होत आहेत. मावळते अध्यक्ष गजानन नाईक यांच्याकडून ते सूत्रे स्वीकारतील. त्यांची अध्यक्षपदाची मुदत दोन वर्षांची असेल.

शरद पाबळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती होत असल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ८३ वर्षांची परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे शरद पाबळे हे ४४ वे राष्ट्रीय अध्यक्ष असतील. शरद पाबळे हे सकाळचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. गेली २५ वर्षे पत्रकारितेत असलेल्या शरद पाबळे यांनी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलेले आहे. शरद पाबळे यांची अध्यक्षपदी निवड होत असल्याबद्दल पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा शुक्रवार (दि. २ )सप्टेंबर रोजी डॉ. चिमा सभागृह हॉर्टीकल्चर कॉलेज इमारत अँग्रीकल्चर कॉलेज, पुणे. येथे सकाळी साडेदहा वाजता एस.एम देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बर्‍याच वर्षानंतर मराठी पत्रकार परिषदेचे अक्षपद पुणे जिल्ह्याला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जिल्हा संघाचे सर्व सदस्य तसेच पत्रकारांनी मोठ्या संख्येने या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी केले आहे.

उरुळी कांचन अखिल तुपे वस्तीच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवात गौतमी पाटील यांच्या आर्केस्ट्राने तरुणाईची मने जिंकली

उरुळी कांचन

उरुळी कांचन अखिल तुपे वस्ती दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी उत्सवाला प्रथमच साहसी खेळाचा दर्जा देण्यात आल्यामुळे गोविंदाने मोठ्या प्रमाणावर खेळाचा आनंद लुटला दहीहंडी उत्सवा मध्ये खेळाचे प्रमुख आकर्षण म्हणून ठरलेला गौतमी पाटील यांचा आर्केस्ट्रा यांची प्रमुख उपस्थितीने बालगोविंदाचे तसेच रसिकांची मने जिंकली.

मोरया ग्रुपने प्रथम पाच थर लावून सलामी दिली तसेच श्रीकृष्ण दहीहंडी मित्र मंडळाने सहा थर लावून दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला.

कार्यक्रमाचे संयोजन अशिष तुपे, सिद्धांत फुलवरे, नवनाथ जगताप अजिंक्य काटे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदेश तुपे यांनी केले तसेच अमित बाबा तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.

या प्रसंगी माजी उपसरपंच सुनील कांचन पाटील, सोरतापवाडीचे माजी सरपंच सुदर्शन चौधरी, भाजपचे अजिंक्य कांचन, बाबा चौधरी, अनिल कांचन, देलवडीचे सरपंच नीलम ताई काटे, रोहित तुपे, रामदास तुपे, स्वराज्य तुपे, सुनील तुपे, आकाश तुपे, किरण तुपे सह अनेक युवा तरुणांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.