नारायणगाव मध्ये भरवस्तीतील ज्वेलर्सचे दुकान फोडले

किरण वाजगे

नारायणगाव (ता.जुन्नर) येथे भर वस्तीमध्ये असलेल्या दोन ज्वेलर्सची दुकाने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेतील तीन ते चार चोरटे एका मारुती कारमधून आले होते. ही घटना (दि. ३० ) ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौक, नारायणगाव येथे घडली. लोळगे सराफ या दुकानातून ३५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व सोन्याच्या दोन नथा व वीस मुरण्या असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.

याबाबतची फिर्याद मंदा प्रकाश लोळगे (वय ६३, राहणार नारायणगाव) यांनी नारायणगाव पोलिसात दिली. त्यानुसार अज्ञान चोरट्यांवर भारतीय दंड विधान कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

लोळगे सराफ या दुकानातील सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज अज्ञान चोरट्यांनी चोरून नेला. तर संजय ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान जागरूक नागरिक पिंटू दिवटे यांच्या सतर्कतेमुळे अज्ञात चोरट्यांना फोडता आले नाही. शटर उचकटण्याचा प्रयत्न करताना सायरन चा आवाज झाल्याने पिंटू दिवटे जागे झाले व त्यांनी आरडाओरडा करताच हे चोरटे पसार झाले.
संजय ज्वेलर्स च्या शेजारीच असलेल्या विक्रांत सहकारी पतसंस्थेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ही घटना बंदिस्त झाली आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार साबळे हे करत आहे.

Previous articleआर्थिक संस्थेत राजकारण व हस्तक्षेप नको – आमदार अतुल बेनके
Next articleउरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील (सन १९९२-९३ )  १० वीचे  विद्यार्थी तब्बल २९ वर्षांनी पुन्हा आले  एकत्र