दुचाकी चोरीतील सराई आरोपी जेरबंद , यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई

योगेश राऊत , पाटस

पुणे जिल्ह्यात मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत टोळीतील एका मोहरक्याला यवत पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यवत, जेजुरी, लोणी काळभोर, हडपसर, लोणीकंद परिसरातील तब्बल १३ मोटारसायकल ची चोरी केली असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

पवन चट्टान राठोड (वय २७ रा. म्हातोबाची आळंदी ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. कार्तिक अविनाश राठोड (रा. जेजुरी ता. पुरंदर जि. पुणे), भीष्म संतोष राठोड ( रा. जेजुरी ता. पुरंदर जि.पुणे ) असे फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तुषार अशोक ताकवणे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, ३ ते ४ जुलै २०२३ दरम्यान यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव येथील तुषार अशोक ताकवणे यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत पारगाव ते सुपा रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले, तसेच
रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले.
त्यात एकावर चोरीचा संशय बळावला आणि यवत गुन्हे शोध पथकाने सहजपुर फाटा येथून संशयित म्हणून पवन चट्टान राठोड यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता पवन राठोड याने त्याचे इतर साथीदार कार्तिक, भीष्म यांच्या मदतीने यवत, जेजुरी, लोणी काळभोर, हडपसर, लोणीकंद हद्दीतून १३ मोटार सायकली चोरल्या असल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, यवत, जेजुरी, लोणी काळभोर, लोणीकंद, हडपसर या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी पवन चट्टान राठोड याला ताब्यात घेत १३ मोटार सायकली असा एकूण किंमत रुपये ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर त्याचे इतर दोन साथीदार फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Previous articleपोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर ८ वर्ष बलात्कार, उकळले ३५ लाख रुपये
Next articleपाटस येथे श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी