पाटस येथे श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

योगेश राऊत पाटस

पाटस (ता. दौंड) येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी ह. भ. प. रंजनाताई जाधव महाराज (फलटण) यांचे कीर्तन झाले. या कीर्तनातून त्यांनी श्री संत सेना महाराज यांच्या संपूर्ण अध्यात्मिक जीवनावर आपल्या प्रवचनातून पांडुरंग व सेना महाराज यांच्या भक्ती बद्दल सांगितले. श्री संत सेना महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराज, संत रोहिदास महाराज, संत नामदेव महाराज यांच्या समकालीन संत होते. जन्म राजस्थानात झाला परंतु महाराष्ट्रात आल्यानंतर वारकरी संप्रदायाचे ते एक भाग बनले. त्यांचे अनेक अभंग चरित्रे याबाबत अनेक संतांच्या अभंगातून दिसून येत असल्याचे त्या म्हणाल्या. किर्तन सेवेनंतर सर्वांना फराळ वाटप करून महाप्रसाद देण्यात आला.

यावेळी पाटस नाभिक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ सोनवणे, रवींद्र गायकवाड , सुदामराव गवळी,नानासो पवार, सोमनाथ गायकवाड, अनिल थोरात, अमोल मदने, दयानंद पवार, संतोष बंड, तुकाराम जाधव, अमोल पंडित, हनुमंत सुरवसे, सचिन चौधरी, नागेश शिंदे, ओंकार पंडित गणेश गवळी, अक्षय सोनवणे, गणेश चव्हाण, श्रेयश कोकाटे, प्रफुल्ल पवार, अमोल चौधरी, वैभव मदने, नेतेमंडळी व असंख्य ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.
श्री संत सेना महाराज पुण्यतिथी समस्त ग्रामस्थ पाटस व समस्त नाभिक समाज यांच्या वतीने साजरी करण्यात आली तसेच दौंड तालुका नाभिक संघटना अध्यक्ष श्री गणेश साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous articleदुचाकी चोरीतील सराई आरोपी जेरबंद , यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई
Next articleदौंड तालुक्यातील खेळाडूंचे ड्रॉप रो बॉल स्पर्धेत यश