दौंड तालुक्यातील खेळाडूंचे ड्रॉप रो बॉल स्पर्धेत यश

 योगेश राऊत ,पाटस

ड्रॉप रो बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र स्पर्धेचे आयोजन नांदवळ गणेश कृपा हॉल ता. कोरेगाव जि. सातारा या ठिकाणी संपन्न झाल्या. या राज्यस्तरीय ड्रॉप रोबॉल स्पर्धेसाठी सातारासह पुणे अहमदनगर ,भंडारा, हिंगोली, संभाजीनगर ,ठाणे ,सांगली कोल्हापूर ,सोलापूर या जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते यासाठी एकूण 275 विद्यार्थी उपस्थित होते अशी माहिती प्रा कैलास महानोर यांनी दिली.

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
१)श्रुती सुधीर टेंगले जवाहरलाल इंग्लिश मीडियम स्कूल रौप्य पदक २) कार्तिकी प्रदीप वाघमोडे शिवा व्हॅली स्कूल रौप्य पदक ३) पूर्वा कैलास महानोर मनोरमा मेमोरियल स्कूल ४) आदित्य संदीप शेळके जवाहरलाल इंग्लिश मीडियम स्कूल रौप्य पदक ५) निरंजन महेंद्र हंडाळ जवाहरलाल इंग्लिश मीडियम स्कूल कास्यपदक ६) आयुष सोनबा हंडाळ जवाहरलाल इंग्लिश मीडियम स्कूल कास्यपदक या सर्व खेळाडूंना प्रा.कैलास महानोर ,स्वप्निल भागवत सर, सचिन राऊत, सौ. रेखा महानोर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या खेळाडूंची दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली

Previous articleपाटस येथे श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा जुन्नरमध्ये उभारणार