पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर ८ वर्ष बलात्कार, उकळले ३५ लाख रुपये

योगेश राऊत, पाटस

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला मी मोठा पोलीस अधिकारी आहे, मोठ मोठे पोलीस अधिकारी माझे मित्र आहेत’, अशी बतावणी करत, यवत येथील एका महिलेला भुरळ पाडून, तब्बल नऊ वर्षे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. एवढ्यावरच न थांबता, तिचे अश्लील व्हिडिओ काढून, ते व्हायरल करण्याची धमकी देत पिडीत महिलेकडून तब्बल ३५ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून यवत पोलिसांनी दौंड शहरातील ठाकूर कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी ही माहिती दिली. मनीष बिलोण ठाकूर, हन्ना मनीष ठाकूर, संदेश मनीष ठाकूर, श्वेता मनिष ठाकूर (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, निरंजन बिल्डींग, दौंड, जि. पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मनीष ठाकूर याने पिडीत महिलेशी ऑगस्ट २०१५ ते मार्च २०२३ या काळात पोलीस असल्याची बतावणी करून, वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला सांगितले तर कुटुंबातील सदस्यांना ठार मारेन, अशी धमकी दिली. मनिश ठाकूर व त्याची पत्नी हन्ना, मुलगा संदेश व मुलगी श्वेता यांनी संगनमताने पिडीत महिलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन, २०१५ ते २०२३ दरम्यान वेळोवेळी ३५ लाख रूपये रोख स्वरूपात घेतले.

Previous articleभारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड तालुका येथे आढावा बैठक संपन्न
Next articleदुचाकी चोरीतील सराई आरोपी जेरबंद , यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई