भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड तालुका येथे आढावा बैठक संपन्न

कुरकुंभ  , सुरेश बागल

दौंड तालुक्यातील कॅम कॅम्पुटर येथे (दि.०५) रोजी दौंड तालुका भारतीय पत्रकार संघाची आढावा बैठक घेण्यात आली. भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिलजी सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ आणि नव्याने निवड झालेले पुणे जिल्हा अध्यक्ष तैनूर शेख यांच्या वतीने पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर, जिल्हा प्रवक्ते दिनेश पवार, दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम यांना सन्मानपत्र देऊन फेरनिवड करण्यात आली.

यावेळी आढावा बैठकीमध्ये सामाजिक, राजकीय आणि अन्य विषयावर प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांनी चर्चा केली. खरोखरच नवीन पुणे जिल्हा अध्यक्ष तैनूर शेख यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांची निवड केलेली आहे.दौंड तालुका भारतीय पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद आहे. असे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर आणि दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ते दिनेश पवार यांनी केले. यावेळी दौंड तालुका भारतीय पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग गडेकर, सचिव सुरेश बागल, कार्याध्यक्ष सदाशिव रणदिवे ,सहसचिव महेश देशमाने, खजिनदार योगेश राऊत उपस्थित होते.

Previous articleउपक्रमशील जिल्हा परिषद शाळा,वडजाई येथे दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा
Next articleपोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर ८ वर्ष बलात्कार, उकळले ३५ लाख रुपये