उपक्रमशील जिल्हा परिषद शाळा,वडजाई येथे दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा

गणेश सातव, वाघोली

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडजाई,आव्हाळवाडी(ता-हवेली)येथे गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळ्यासाठी सकाळीचं मुले पारंपरिक श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत शाळेत आली होती.रोजच्या परिपाठानंतर मुख्याध्यापक शंकर बडे सरांनी मुलांना भगवान श्रीकृष्ण जन्म आणि त्यांच्या बाललीला,अवतार कार्य याबाबत गोष्टीरुपी माहिती सांगितली. गोपाळकाला का करायचा,त्याचे महत्व,भगवान श्रीकृष्ण जसे सर्व गोपाळांमध्ये उच्च- नीच भेदभाव न करता सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून काला करत व तो काला सर्वांना खाऊ घालतं त्याच मार्गावर आपण चालून सर्वांशी प्रेमाने वागावे या विषयी मार्गदर्शन केले.

त्यांनतर भजने,मुलींचा गरबा, मुलांचे गोविंदा नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.मुलांनी दोर बांधून दहीहंडीची तयारी केली.हंडीला रंग-फुलांनी सजवून,त्यात दही,लाह्या याचा काला टाकून ती हंडी दोराच्या सहाय्याने वरती बांधण्यात आली.नंतर मुलांनी एकमेकांच्या हातात हात घालून स्नेह,समता व बंधुतेचा सांघीक थर करुन बालकृष्णा वेशातील छोट्या विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन दहीहंडी फोडली.

दहीहंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी सौ.सुरेखा खोसे मॅडम,वैष्णवी सातव मॅडम यांनी परिश्रम घेतले.मुलांना काला प्रसाद,पौष्टीक भेळ आणि मसालेभात नाष्टा म्हणून देण्यात आला.दरम्यानच्या काळात या कार्यक्रमासाठी बबन सातव सर यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाची सांगता आळंदी येथून आलेले ह.भ.प.राम महाराज कासार व माऊली महाराज चिलगर यांच्या सुंदर गौळणीने झाली.

मुख्याध्यापक शंकर बडे यांनी सर्वांचे आभार मानले व नंतर सोहळ्याची सांगता झाली.

Previous articleजनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न
Next articleभारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड तालुका येथे आढावा बैठक संपन्न