जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न

घोडेगाव: मोसीन काठेवाडी

5 सप्टेंबर,राष्ट्रीय शिक्षक दिन जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव येथे उत्साहात संपन्न झाला. 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून जनता विद्या मंदिर मध्ये विद्यार्थ्यांनी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे संपूर्ण कामकाज हे विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थी सेवक यांनी पाहिले विद्यार्थी शिक्षक म्हणून प्राचार्य पदाची धुरा प्रणाली घोडेकर हिने सांभाळली,तर उपप्राचार्य कु. सुदीप कुर्हे तर विषयशिक्षक म्हणून विविध शाखांमधील ५४ विद्यार्थ्यांनी तर सेवक म्हणून केतन इंदोरे आणि रवी घोडे या विद्यार्थ्यानी काम पाहिले. शिक्षकांची नेमकी भूमिका काय असते याची अनुभूती विद्यार्थ्यांना यातून आली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना शिक्षकाचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्व आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही शिक्षकाची गरज किती आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी सांगितले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकारामशेठ काळे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थेचे कार्याध्यक्ष व समन्वय समिती चेअरमन राजेश काळे आणि उपप्राचार्य धनंजय पातकर हे या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक झालेल्या कु.आदिती गावडे हिने केले. शिक्षक मनोगतात विद्यालयाचे प्राध्यापक शितल पवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये आधुनिक काळात शिक्षकांची वाढलेली जबाबदारी नमुद करून 4g आणि 5g च्या युगात गुरुजी हे किती महत्त्वाचे असतात हे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातील पांडूरंग फलके सर, शितल पवार सर, कुमार उजागरे सर, सचिन कदम सर, सौ शर्मिला कर्पे मॅडम, सौ. मीरा चव्हाण मॅडम, आणि लक्ष्मण आढाव सर यांनी केले.

Previous articleजनता विद्या मंदीर शाळेत तब्बल 42 वर्षानंतर पुन्हा भरला वर्ग
Next articleउपक्रमशील जिल्हा परिषद शाळा,वडजाई येथे दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा