जनता विद्या मंदीर शाळेत तब्बल 42 वर्षानंतर पुन्हा भरला वर्ग

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

जनता विद्या मंदिर या विद्यालयातील विद्यार्थी उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन काही विद्यार्थी उच्च स्तरावर नोकऱ्या करत आहे आणि इथून पुढच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले भवितव्य उज्वल करावं असे प्रतिपादन कांतीलाल परदेशी सर यांनी केले.

आंबेगाव तालुक्यातील अग्रगण्य असलेली शिक्षण संस्था,आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित जनता विद्या मंदीर शाळेत सन 81व 82 चा वर्ग तब्बल 42 वर्षानंतर,सर्व मित्र,मैत्रिणी एकत्र येऊन गेट-टुगेदरचा कार्यक्रम संपन्न झालय.

या कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे व वर्गशिक्षक अशोक सोनवणे सर,विजय काळे सर , कांतीलाल परदेशी सर सौ सुनंदा काळे मॅडम शरद काळे सर यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले.

श्री कांतीलाल परदेशी सर व सुनंदा काळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रम संपल्यानंतर हॉटेल्स स्क्वेअर रिसॉर्ट व हुतात्मा बाबू गेनू जलाशय या ठिकाणी जाऊन सर्व मित्र-मैत्रिणींनी आनंद घेतला व नाश्तापाणी करून संध्याकाळी एकत्रित भोजन करून शेवटी साल सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन सर्व मित्र मैत्रिणी निरोप घेतला
कार्यक्रमाचे नियोजन सर्व मित्र मैत्रिणी एकत्रित आणण्यासाठी सुशीला व अलका या दोघींनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleसंतोष थोरात यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मान
Next articleजनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न