संतोष थोरात यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मान

आंबेगाव – मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक संतोष रामचंद्र थोरात यांस क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

मुंबई नरीमन पॉईंट येथील टाटा थिएटर,एन.सी.पी.ए हॉल मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांचे अध्यक्षतेखाली शिक्षक थोरात यांस प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व एक लाख दहा हजार रुपयांचा धनादेश देवून सपत्नीक गौरविण्यात आले.यावेळी विधान परिषदेचे शिक्षक आमदार विक्रम काळे,कपिल पाटील,अरुण सरनाईक,शालेय शिक्षण प्रधान सचिव रनजीतसिंग देओल,शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी,मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक थोरात हे गेले १६ वर्ष प्राथमिक म्हणून काम करत आहे.गेली साडेपाच वर्ष श्री.क्षेत्र भीमाशंकर जवळील निगडाळे या आदिवासी शाळेत राबवलेले नाविन्यपूर्ण नवोपक्रम, डिजीटल शाळा निर्मिती,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेद्वारे बालआनंद मेळाव्याचे आयोजन,१००% पटनोंदणी, १००% उपस्थिती, शाळा परिसरात शाळाबाह्य विद्यार्थी नाहीत,विद्यार्थी सर्वागीण गुणवत्ता वाढेतून प्रगत शाळा निर्मितीमुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

यावेळी साने गुरुजी कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक लहू घोडेकर, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक विकास कानडे,आदर्श शिक्षक चांगदेव पडवळ,संतोष कानडे,मुख्याध्यापिका मनीषा कानडे,रामचंद्र थोरात,शिक्षक अशोक रेपाळे,संतोष भोर,औषधनिर्माण अधिकारी मनोज सोबाजी,दादाभाऊ टाव्हरे, रोहिणी पडवळ,उज्ज्वला राक्षे,अश्विनी तांबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleकौठळी शाळेत बाल गोपाळांनी फोडली अशैक्षणिक कामांची प्रतिकात्मक दहीहंडी
Next articleजनता विद्या मंदीर शाळेत तब्बल 42 वर्षानंतर पुन्हा भरला वर्ग