कौठळी शाळेत बाल गोपाळांनी फोडली अशैक्षणिक कामांची प्रतिकात्मक दहीहंडी

 श्रावणी कामत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे गोपाळकाला (दहीहंडी) उत्सव साजरा करण्यात आला. आरती गायकवाड व भारत ननवरे यांनी गोपाळकाला(दहीहंडी) या सणाची माहिती विद्यार्थी व पालकांना दिली.आजच्या दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी, पालकांनी शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो तरी शिक्षकांना निरक्षर सर्वेक्षण, बांधकाम, आधारकार्ड, बी एल ओ,स्वच्छता पंधरवडे यांसारखी अशैक्षणिक कामे देऊ नयेत म्हणून त्या कामांची प्रतिकात्मक दहीहंडी फोडली.

पालक व उपस्थित ग्रामस्थ यांनी भावना व्यक्त केली की शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देता आमच्या मुलांना शिकवू द्या.

कृष्ण,राधा,साडी घातलेल्या मुली,फुगे,फुले,गीतांनी परिसर दणानून गेला होता.मुलांनी नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला. शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोरे रचून दहीहंडी फोडली.सर्व विद्यार्थी, पालक,ग्रामस्थांना प्रसाद देण्यात आला.सदर कार्यक्रमास शाळचे मुख्याध्यापक, शिक्षक,पालक,मातापालक,ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पालक,ग्रामस्थ व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत केली.आभार अमित भोंग यांनी मानले.

Previous articleघोडेगाव येथील राजा हरिश्चंद्र महादेव यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
Next articleसंतोष थोरात यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मान