घोडेगाव येथील राजा हरिश्चंद्र महादेव यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

मोसीन काठेवाडी

घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील श्री राजा हरिश्चंद्र महादेव यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताहाच्या शेवटी गौरीशंकर सभामंडपात श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान संचालित नटराज संगीत नृत्य विदयालयाने शास्त्रीय नृत्य अविश्कारातून शिव आराधना सादर केली. यामध्ये नृत्य शिक्षिका नेहाताई नांगरे यांच्या सोबत डॉ.दिपाली मांढरे,डॉ.स्नेहल गुजराथी,डॉ.सायली तोडकर,श्वेता काजळे यांसह विदयार्थीनी जानवी माळी, रिद्धी काळे, सिद्धी काळे, रेवा काळे , रायका काळे ,अन्वि तोडकर, स्वरा झोडगे ,सुकन्या कोथावळे,तिलोत्तमा वायाळ,परिज्ञा बाणखेले, रायका काळे,हेमन्या प्रशांत काळे काव्या बिरादार , समृद्धी गिरे यांनी सहभाग घेतला तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक न्यु इंग्लिश स्कुल लांडेवाडीच्या प्राध्यापिका सिमा काळे यांनी केले.तर शेवटी अभार नेहा नांगरे यांनी मानले.

Previous articleनारायणगाव महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
Next articleकौठळी शाळेत बाल गोपाळांनी फोडली अशैक्षणिक कामांची प्रतिकात्मक दहीहंडी