नारायणगाव महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

नारायणगाव :- (किरण वाजगे)

नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या शिक्षक दिन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी शिपायापासून ते प्राध्यापक व प्राचार्य अशा भूमिका सादर केल्या.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी.बी.होले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व महत्त्व विशद केले. वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.डी टाकळकर यांनी शिक्षकांविषयी असलेला आदर, शिक्षक हा पवित्र कार्याचे काम करत असून अनेक युवक घडवण्याचे कार्य सातत्याने करत असतो.”असे विचार व्यक्त केले.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सिद्धी आर्वीकर हिने प्राचार्य, तेजस मधे याने उपप्राचार्य व पुनीत वाकचौरे यांनी वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून भूमिका साकार केल्या. आदिती चाळक, गौरी आरोटे, सेजल सहाने, निकिता खुळे, राधिका थेटे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली
यावेळी सुरज शिंदे ,ओंकार भोर, ज्ञानेश्वर खांडगे, सुजित मुटके या विद्यार्थ्यांनी देखील शिपाई वर्गाची भूमिका पार पाडली.
विद्यालयातील वाणिज्य विभागातील ७० विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून आपला सहभाग नोंदवला .

व्यवसाय प्रशासन विभाग प्रमुख डॉ.अनुराधा घुमटकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.श्रीकांत फुलसुंदर, प्रा. आकाश कांबळे, प्रा.वामन , प्रा. वैभव शिंदे, प्रा.पूजा वाव्हळ, प्रा. प्रतिभा मोहिते, प्रा.वाघ मॅडम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए.बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा.डॉ.व्ही. एस. मोढवे, डॉ.मधुरा काळभोर, प्रा एस.ए. जगदाळे ,प्रा.डॉ.एस.बी. खरात,प्रा.तनुजा वाघ, प्रा.पूनम आवटे,
प्रा.डॉ.व्ही.टी.पाटे, प्रा.डॉ.ए.ए.जगदाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले. तर आभार अनुष्का खैरे यांनी मानले.

Previous articleकुरकुंभ परिसर सोमवारी कडकडीत बंद : आंदोलन कर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज प्रकरणी मराठा समाजाचा निषेध
Next articleघोडेगाव येथील राजा हरिश्चंद्र महादेव यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन