कुरकुंभ परिसर सोमवारी कडकडीत बंद : आंदोलन कर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज प्रकरणी मराठा समाजाचा निषेध

कुरकुंभ : सुरेश बागल

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे (दि ०४.) रोजी सकाळी १०:०० वाजता जालना जिल्ह्यातील सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलन कार्यकर्त्यांवर पोलीस अधिकाऱ्याकडून लाठीचार्ज केल्यामुळे सरकारचा कुरकुंभ या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला.

कुरकुंभ, पांढरेवाडी, जिरेगाव या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाडून सरकारच्या जाहीर निषेध करण्यात आला आहे. कुरकुंभ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर या मुख्य चौकात एक मराठा लाख मराठा ,मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ,अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ,लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबन करून कारवाई करण्यात यावी, कोपर्डी महिला बलात्कार आरोपीला फाशी देण्यात यावी ,ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे त्यामध्ये दुरुस्ती व्हावी .अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन मराठा समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

यावेळी मराठा समाजाचे झुंबर शितोळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल शितोळे ,आरपीआय गटाचे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ गायकवाड, निलेश भागवत आणि मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.

Previous articleपीसीईटी मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
Next articleनारायणगाव महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा