हातात कोयता घेवून दहशत करणाऱ्या एक जणाला अटक : आरोपीची येरवड्यात रवानगी

नारायणगाव :- (किरण वाजगे)
नारायणगाव येथील गोकुळ दूध डेअरी समोर हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन दहशत करणाऱ्या एक जणाला नारायणगाव पोलिसांनी रंगेहात पकडले.

बुधवार  दि. ३०) रोजी मध्यरात्री आरोपी राहुल रामअजोरे गौतम (वय २७, राहणार कोल्हे मळा, नारायणगाव) हा गोकुळ दूध डेअरी समोर कोल्हे मळा रस्त्यावर धारदार लोखंडी कोयता घेऊन दहशत करत असताना निदर्शनास आला याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला नारायणगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली. या आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, हवालदार घोडे, मंगेश लोखंडे, शैलेश वाघमारे, दत्ता ढेंबरे, गोरक्ष हासे, थोरात, केंद्रे, कोतकर, कोळी यांच्या पथकाने केली या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील करीत आहेत.

Previous articleथर्माकोल, प्लॅस्टिकचा वापर बंद करून वसुंधरेचे रक्षणासाठी पर्यावरणाच्या चळवळीत कार्यरत रहा : भारतीय मजदूर संघ
Next articleबिबट्या बरोबर सेल्फी, त्याच्याबरोबर चालणे त्याच्या अंगावर हात फिरवण्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल