थर्माकोल, प्लॅस्टिकचा वापर बंद करून वसुंधरेचे रक्षणासाठी पर्यावरणाच्या चळवळीत कार्यरत रहा : भारतीय मजदूर संघ

कुरकुंभ , सुरेश बागल

२८ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय पर्यावरण दिन म्हणून देशभरात मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रात सेमिनार, मेळावे, वृक्षारोपण, जनजागृती च्या माध्यमातून भारतीय मजदूर संघाच्या वतीने साजरा केला जातो, याचाच भाग म्हणून भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने विश्वकर्मा भवन शनिवार पेठ पुणे येथे पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत “थं क्रिएटीव्ह पर्यावरण दक्षता मंच” चे अध्यक्ष श्री. प्रशांत अवचट प्रमुख वक्ते म्हणून होते, मंचावर भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. अर्जुन चव्हाण व पर्यावरण रक्षण मंच चे पुणे जिल्हा प्रमुख अभय वर्तक होते.

गेल्या काही वर्षात पर्यावरणा मध्ये मोठ्या प्रमाणात सतत बदल होत आहेत, ॠतुमानात बदल, पावसाचे बदललेल्या प्रमाण, तापमानात वाढ, ई बाबी मोठ्या प्रमाणात निसर्गात बदल होत आहेत, या परिणाम समाजात होतो आहे, प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या वापर केल्या मुळे, निसर्गाची हानी होते आहे.

जल प्रदुषण, जमीनीवर परिणाम होतो आहे. त्यामुळे पुर्नवापर होणारे वस्तूंच्या वापर करण्यासाठी जनजागृती करून अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही राहली पाहिजे असे मनोगत श्री. प्रशांत अवचट यांनी केले आहे. तसेच संत झानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आंळंदी ते पंढरपूर दिंडी मध्ये नैसर्गिकरीत्या पत्रावळ्या चा वापर करण्यात साठी जनजागृती करून महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

या वेळी अभय वर्तक यांनी प्रास्ताविक केले, व आभार प्रदर्शन अध्यक्ष श्री. अर्जुन चव्हाण यांनी केले आहे.

या कार्यक्रमात भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, कंत्राटी कामगार संघांचे उमेश आणेराव, ऊमेश विस्वाद, रविंद्र देशपांडे, विवेक ठकार , बेबीराणी डे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleनिगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ‘चांद्रयान -३’ मोहिमेच्या लँडींगचा अनुभवला ऐतिहासिक क्षण
Next articleहातात कोयता घेवून दहशत करणाऱ्या एक जणाला अटक : आरोपीची येरवड्यात रवानगी