निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ‘चांद्रयान -३’ मोहिमेच्या लँडींगचा अनुभवला ऐतिहासिक क्षण

आंबेगाव ,मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुक्यातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ‘चांद्रयान -३’ मोहिमेच्या लँडींगचा ऐतिहासिक क्षण अनुभवला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) बहुचर्चित ‘चांद्रयान -३’ मोहिमेच्या लँडरने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लँडींग केले.हा ऐतिहासिक क्षण पाहता यावा यासाठी येथील शाळेत प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली होती.

 

 

यावेळी शाळेतील शिक्षक संतोष थोरात यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान मोहीमे बद्दल माहिती सांगितली.चांद्रयान-3 विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लँडींग केल्यावर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तिरंगा झेंडा फडकावत व टाळ्या वाजवून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या.रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यामुळे तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्य उलगडण्यास मदत होणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी सांगितली.

Previous articleघोडेगाव येथे नर्मद हर ग्रुप परिवारातर्फे ज्ञानेश्वरी सप्ताहाचे आयोजन
Next articleथर्माकोल, प्लॅस्टिकचा वापर बंद करून वसुंधरेचे रक्षणासाठी पर्यावरणाच्या चळवळीत कार्यरत रहा : भारतीय मजदूर संघ