बिबट्या बरोबर सेल्फी, त्याच्याबरोबर चालणे त्याच्या अंगावर हात फिरवण्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

नारायणगाव

बिबट्याच्या दहशतीची बातमी आपण सर्वत्र पाहिली असेल मात्र एका व्हायरल होत असलेल्या अनोख्या बिबट्याची बातमी आपण पाहणार आहोत…..

“बिबट्याने पोल्ट्री फार्म मध्ये घुसून शंभर कोंबड्यांना फस्त केले”. “मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारले. लहान मुलांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले” अशाप्रकारच्या बातम्यांमधून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत आपल्याला पहायला व ऐकायला मिळते.
बिबट्या प्रत्यक्ष समोर आल्यानंतर किंवा त्याला जवळ पाहिल्यानंतर त्रेधातिरपीट उडते, अनेकांची भंबेरी उडते.
परंतु प्रत्यक्षात जर बिबट्याच्या पाठीवर हात ठेवून त्याच्याबरोबर चालणे किंवा त्याच्याशी गप्पा मारणे, त्याच्याबरोबर सेल्फी, फोटो काढणे हा प्रकार फारसा ऐकिवात नाही मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
एक बिबट्या शेतातून जात असताना त्याच्यासोबत त्याच्या बरोबर चालून त्याच्या अंगावर हात फिरवून तसेच काहीजण त्याचा सेल्फी काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारे एका आजारी बिबट्याला सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांसमवेत आपण पाहिले आहे. त्यावेळी बिबट्याशी लगट करून त्याच्याबरोबर फोटो काढणे किंवा त्याच्याशी खेळणे अनेकांना महागात पडले होते कारण वनविभागाने अशा हौशी कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला होता. याच अनुषंगाने अशा प्रकारे फोटो काढणे तसेच त्याच्याशी लगट करणे या कार्यकर्त्यांना देखील महागात पडू शकते हाच वायरल व्हीडीओ आपल्या खास दर्शकांसाठी पाठवला आहे आपले प्रतिनिधी किरण वाजगे यांनी पाहुयात…

Previous articleहातात कोयता घेवून दहशत करणाऱ्या एक जणाला अटक : आरोपीची येरवड्यात रवानगी
Next articleलायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश रायकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला वॉटर प्युरिफायर भेट