लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश रायकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला वॉटर प्युरिफायर भेट

नारायणगाव – (किरण वाजगे)

लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष ला. योगेश रायकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यात सकाळी न्याहारी कट्टा ग्रूपच्या माध्यमातून सुमारे १५० गरजू लोकांना सकाळी नाश्ता देण्यात आला, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे ला.डॉ.रविंद्र डुंबरे सर यांच्या सौजन्याने वॉटर प्युरिफायर सेट बसवून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी लायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन ला.शिरीष जठार,अध्यक्ष ला.योगेश रायकर,सचिव ला.राजेंद्र देसाई,खजिनदार ला.संजय शिंदे,प्रथम अध्यक्ष ला.विश्वास भालेकर,ला.दिपक वारुळे, जितेंद्र गुंजाळ, ला.मच्छिंद्र मुंडलिक,ला.मनोज भळगट,ला.अशोक खांडगे,ला.डॉ.रविंद्र डुंबरे,ला.शशिकांत वाजगे,ला.अजय चोरडिया,ला.संतोष जाधव,ला.संपत शिंदे,ला.विकास दरेकर,ला.जवाहर गुगळे,ला.डॉ. विलास नाईकोडी,ला.योगेश जुन्नरकर,ला.अजित वाजगे, ला.सुनिल चोरडिया,ला.दिलदीप बांगा, ला.सचिन भोर,ला.सचिन वऱ्हाडी,ला.डॉ.मयुरेश घाडगे, संदीप शिंदे, सचिन विश्वासराव, संतोष रासने, प्रशांत शिंदे, महेश शेटे, अशोक अण्णा खांडगे, संजय व-हाडी शेखर गायकवाड, उद्धव व-हाडी ,नामदेव वाणी, मुख्याध्यापिका वनिता हांडे, चेअरमन राजेश बाबुराव खांडगे, सतीश खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleबिबट्या बरोबर सेल्फी, त्याच्याबरोबर चालणे त्याच्या अंगावर हात फिरवण्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Next articleनर्मदे हर परिवारा तर्फे जनता विद्या मंदीर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू साहित्य भेट