उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील (सन १९९२-९३ )  १० वीचे  विद्यार्थी तब्बल २९ वर्षांनी पुन्हा आले  एकत्र

 

 

 

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात  माजी विद्यार्थ्यांचा “स्नेहमेळावा” पार पडला. यानिमित्त इयत्ता १० वी चे १९९२-९३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २९ वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे माजी शिक्षक व सध्या नागपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले  लठाड सर तसेच  वनवे सर (शिक्षणाधिकारी) प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमात माजी प्राचार्य अरविंद खिरे सर , किसनराव नेवसे सर , बबनराव दिवेकर सर, बाळकृष्ण काकडे सर, सय्यद सर, कांचन सर, सौ.बडगुजर मॅडम , विद्यमान प्राचार्य भारत भोसले सर, उपप्राचार्य किसन कोकाटे सर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल-श्रीफळ ,व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थीनी मिळून १७५ जण उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमेकांशी सुसंवाद साधून आठवणींना उजाळा दिला. आपापल्या वर्गात जाऊन वर्गशिक्षकांबरोबर संवाद साधला. याप्रसंगी प्रस्ताविक व स्वागत डॉ. शरद गोते यांनी केले. सूत्रसंचालन विकास म्हेत्रे तर आभार सदानंद बालगुडे यांनी मानले. यावेळी दिपक थोरात, भाऊसाहेब महाडिक, गणेश पवार ,संजय पोतदार ,सुवर्णा कांचन, हेमलता पवार ,यांनी मनोगत व्यक्त केले.

 

या स्नेहमेळाव्यासाठी कालिदास तुपे, संतोष शितोळे, अजय सोनवणे, नाना चौधरी, नितीन गोते, सूर्यकांत काकडे, चंद्रशेखर शितोळे, विजय तांबे, शेखर अलिपुर, सतीश टिळेकर, महादेव रेवडकर, गोविंद शिंदे, सुनील निकाळजे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमा नंतर सर्वांनी कोरेगाव (मूळ) येथील “नेचर नेस्ट “मध्ये स्नेहभोजन केले.

Previous articleनारायणगाव मध्ये भरवस्तीतील ज्वेलर्सचे दुकान फोडले
Next articleसोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गणेश फेस्टिवलेचे आयोजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन