सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गणेश फेस्टिवलेचे आयोजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

उरुळी कांचन

सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हल २०२२’ चा शुभारंभ बुधवारी (ता. ३१) ऑगस्टपासून होत आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या वतीने ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या काळात आयोजित “सोरतापवाडी गणेश फेस्टिवल २०२२” चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार निलेश राणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक प्रदीप कंद, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश भेगडे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा माजी सरपंच कार्यक्रमाचे संयोजक सुदर्शन चौधरी यांनी दिली.

या फेस्टिवलमध्ये बुधवारी (ता. ३१) श्रींची प्रतिष्ठापना संध्याकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ०१) सकाळी कार्यक्रमाचे उद्घाटन व संध्याकाळी खेळ रंगला वहिनींचा होम मिनिस्टर, शुक्रवारी (ता. ०२) संध्याकाळी ऑर्केस्ट्रा, शनिवारी (ता. ०३) प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिव व्याख्यान, रविवारी (ता. ०४) डान्स व मिमिक्री स्पर्धा, सोमावारी (ता. ०५) संतोष पवार प्रस्तुत नाटक सुंदरा मनात भरली. मंगळवारी (ता. ०६) प्रसिद्ध लावण्यांचा कार्यक्रम तुमच्यासाठी काय पण, बुधवारी (ता. ०७) हा जल्लोष महाराष्ट्राचा, गुरुवारी (ता. ०८) प्रसिद्ध कीर्तनकार हभप रामराव महाराज ढोक यांचे संपूर्ण कीर्तन, शुक्रवारी (ता. ०९) भव्य विसर्जन मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी पुर्व हवेली तालुक्यातील विविध गावचे सरपंच – उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन – व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, तरुण वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे अशी माहिती सुदर्शन युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुहास चौधरी यांनी दिली.

Previous articleउरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील (सन १९९२-९३ )  १० वीचे  विद्यार्थी तब्बल २९ वर्षांनी पुन्हा आले  एकत्र
Next articleटिळेकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुभाष लोणकर यांची बिनविरोध निवड