टिळेकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुभाष लोणकर यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन

टिळेकर वाडी गावच्या सरपंचपदी सुभाष लोणकर तर उपसरपंचपदी नंदा जगन्नाथ राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी तथा मंडलाधिकारी नुरजहा सय्यद यांनी घोषित केले. खामगाव टेक मधून विभक्त होऊन टिळेकरवाडीची प्रथमताच ग्रामपंचायत निवडणूक सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्याचप्रमाणे सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध करण्यात आली. उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे एपीआय किरण धायगुडे यावेळी उपस्थित होते. यावेळी म.गा.सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गावची निवडणूक बिनविरोध झाली.

यावेळी श्री दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर, मा.सरपंच निता विजय टिळेकर, आबासाहेब टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश टिळेकर, गोवर्धन टिळेकर, सुशील राऊत, सुषमा टिळेकर, कल्पना टिळेकर, वैशाली चौरे, सदाशिव टिळेकर, सुभाष टिळेकर, बाळासाहेब चौरे, ग्रामविकास अधिकारी स्वाती बोराटे उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजना राबविण्यात येणार ग्रामस्थांनी जो विश्वास दाखवला तो आम्ही सार्थ करुन दाखवणार ग्रामपंचायतच्या विविध विकास कामाच्या माध्यमातून असे सरपंच सुभाष लोणकर यांनी सांगितले.

Previous articleसोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गणेश फेस्टिवलेचे आयोजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Next articleनारायणगाव महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे उत्साहात आयोजन