आर्थिक संस्थेत राजकारण व हस्तक्षेप नको – आमदार अतुल बेनके

नारायणगाव (किरण वाजगे)

श्रीराम पतसंस्थेची स्थापना माजी आमदार वल्लभ बेनके यांनी केली असून आर्थिक संस्थेत राजकारण व हस्तक्षेप नको या त्यांच्या भूमिकेचे पालन होत असल्याने श्रीराम पतसंस्थेची चांगली प्रगती झाली आहे असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

श्रीराम नागरी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नारायणगाव येथे सोमवारी (दि.२९) रोजी रघुकुल सभागृह येथे संस्थेचे चेअरमन तानाजी डेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी आमदार अतुल बेनके बोलत होते. संस्थेला १ कोटी ७९ लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला असून सभासदांना १५ टक्के लाभांश व दिवाळी भेटवस्तू देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

कार्यक्रमात संस्थेच्या वतीने आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, माजी सैनिक, गुणवंत कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या आळेफाटा येथील शाखेला उत्कृष्ट शाखा म्हणून गौरविण्यात आले. व्यवस्थापक सतिश भार्गव यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे यांनी पतसंस्थेच्या २०२१-२२ आर्थिक वर्षात संस्थेला “अ”ऑडिट वर्ग, ९३८५ सभासद व १५५ कोटीच्या ठेवी असल्याचे सांगितले. अहवाल सालात २५ कोटीच्या ठेवीत तर नफ्यात ६५ लाखाची वाढ झाली आहे. संस्थेने १२० कोटी ३९ लाखांचे कर्ज वाटप केले असून १७९ कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. कोरोना संसर्गाच्या काळात पतसंस्थेने विविध समाज हिताचे उपक्रम राबवले आहे.
संस्थेचे संचालक व राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके यांनी संचालक मंडळ सभासदांच्या हिताचे निर्णय घेत आहे. आर्थिक शिस्त पाळून पतसंस्थेने गुणात्मक प्रगतीचा आलेख उंचावला असल्याचे म्हटले.

याप्रसंगी सुनील श्रीवत, संचालक राजश्री बेनके, अमित बेनके, शशिकांत वाजगे, अनिल थोरात, यल्लू लोखंडे, विजय घोगरे, अनिल डेरे, ज्ञानेश्वर रासने, नवनाथ चौगुले, अमीर तांबोळी, शीलाताई मांडे, सिताराम पाटे उपस्थित होते. ज्येष्ठ सभासद रत्नाकर सुबंध, नंदकुमार श्रीवत, अरुण औटी, दशरथ खेबडे, बाबुराव मुळे यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश नलावडे यांनी अहवाल वाचन केले तर उपाध्यक्ष सुनील श्रीवत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous article६५ वर्षांच्या शिवकन्यांनी जिंकली शिवप्रेमींची मने !
Next articleनारायणगाव मध्ये भरवस्तीतील ज्वेलर्सचे दुकान फोडले